Reliance Jio GigaFiber : तब्बल 100Mbps स्पीड, ऑफर, प्लान आणि सर्वकाही

Jio च्या गिगा फायबर सर्विसच्या योजनांची सुरुवात 699 रुपयांपासून होईल. तर कंपनीची सर्वात महाग योजना 8 हजार 499 रुपयांची आहे. मात्र, मोफत एलईडी टीव्हीबाबत कंपनीने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही.

Reliance Jio GigaFiber : तब्बल 100Mbps स्पीड, ऑफर, प्लान आणि सर्वकाही
Follow us
| Updated on: Sep 05, 2019 | 9:42 PM

मुंबई : Reliance Jio कडून अखेर बहुप्रतिक्षित GigaFiber सर्विसच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे (Jio GigaFiber plans launched). Jio ला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गिगा फायबर सर्विसला लाँच करण्यात आलं होतं. Jio च्या गिगा फायबर सर्विसच्या योजनांची सुरुवात 699 रुपयांपासून होईल. तर कंपनीची सर्वात महाग योजना 8 हजार 499 रुपयांची आहे. मात्र, मोफत एलईडी टीव्हीबाबत कंपनीने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही.

Reliance Jio फायबरचे प्लान्स

  • यावेळी जियोने आपल्या नव्या प्लानमध्ये डेटा लिमीट सेट केली आहे, जे आश्चर्यकारक आहे. 699 रुपयाच्या प्लानमध्ये युझर्सना 100Mbps स्पीड मिळेल. पण, या प्लानमध्ये डेटा लिमिट 100GB इतकी देण्यात आली आहे. त्याशिवाय, बेसिक प्लानमध्ये युझर्सना 50GB बोनस डेटाही मिळेल.
  • दूसऱ्या प्लानसाठी कंपनीने 849 रुपये किंमत ठेवली आहे. यामध्ये युझर्सना 100Mbps स्पीड आणि 200GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये कंपनी युझरला 200GB डेटा ऑफर करत आहे.

  • कंपनीचा तिसरा प्लान 1,299 रुपयांचा आहे. यामध्ये 250Mpbs स्पीड आणि 500GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये बोनस डेटा 250GB आहे.
  • कंपनीने 500Mbps स्पीड असलेला प्लानही लाँच केला आहे. या प्लानची किंमत 2,499 रुपये आहे आणि युझरला यामध्ये 1,250GB डेटा मिळेल. त्याशिवाय, कंपनी 250GB बोनस डेटाही देत आहे.

  • 3,999 रुपयांच्या प्लानमध्ये युझरला 500Mbps स्पीड आणि 2500GB डेटा मिळेल.
  • कंपनीचा सर्वात महाग प्लान 8,499 रुपयांचा आहे. यामध्ये युझरला 1Gbps स्पीडसोबतच 5 हजार GB डेटा मिळेल.

  • कंपनीने सर्व प्लानसाठी किमान स्पीड 100mbps सेट केली आहे. डेटा लिमीट संपल्यावर युझरला 1mbps स्पीड मिळेल. बोनस डेटासाठी कंपनीने 6 महिन्याची व्हॅलिडिटी ठेवली आहे. म्हणजेच महिन्याचा प्लान संपल्यावरही त्यावर मिळणारा बोनस डेटा हा तुमच्या पुढील महिन्याच्या डेटामध्ये अॅड होईल.

2,500 रुपयांमध्ये कनेक्शन मिळणार

Jio फायबरचं कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 2 हजार 500 रुपये खर्च करावा लागणार आहे. यामध्ये 1 हजार 500 रुपये सिक्युरिटी आहे, जी युझरला नंतर परत मिळेल. तर, 1 हजार रुपये ही कनेक्शन फी आहे. प्रत्येक नव्या कनेक्शनसोबत युझरला नवीन सेट-टॉप बॉक्स मोफत मिळेल.

संबंधित बातम्या :

Google Play Store मधून ‘हे’ अॅप हटवलं, लाखो युजर्सवर मालवेअर अटॅक

Reliance Jio GigaFiber : किंमत, पॅकेज आणि सर्व काही…

Huawei चा गुगलला झटका, नवं ऑपरेटिंग सिस्टीम HarmonyOS लाँच

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, ‘हे’ आहेत खास फीचर्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.