Reliance JioBook लॅपटॉप लवकरच लाँच होणार, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन्स लीक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 14, 2021 | 8:35 AM

रिलायन्स जिओ आपला पहिला लॅपटॉप JioBook लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने उत्पादनाच्या डेव्हलपमेंटबद्दल मौन बाळगले आहे, परंतु गीकबेंचवरील नवीन सूचीने लॅपटॉपबद्दल काही महत्त्वाचे तपशील उघड केले आहेत.

Reliance JioBook लॅपटॉप लवकरच लाँच होणार, गीकबेंचवर स्पेसिफिकेशन्स लीक
Reliance Jiobook

Follow us on

मुबई : रिलायन्स जिओ आपला पहिला लॅपटॉप JioBook लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने उत्पादनाच्या डेव्हलपमेंटबद्दल मौन बाळगले आहे, परंतु गीकबेंचवरील नवीन सूचीने लॅपटॉपबद्दल काही महत्त्वाचे तपशील उघड केले आहेत. Reliance JioBook बद्दल नवीन लीकनुसार NB1112MM कोडनेम असलेल्या उत्पादनांची लेटेस्ट लिस्ट MySmartPrice वर पाहायला मिळाली आहे. (know Reliance JioBook laptop price, specs on launch details)

यापूर्वी, हाच मॉडेल क्रमांक BIS प्रमाणपत्रावर आणखी दोन मशिन्ससह दिसला होता ज्यामध्ये NB1148QMW आणि NB1112MM चा समावेश आहे. हे सूचित करते की रिलायन्स जिओ तीन वेगवेगळ्या लॅपटॉपची सिरीज लॉन्च करण्याचा विचार करत आहे. लॅपटॉपबद्दल लॉन्च डिटेल्स अधिकृतपणे उघड केले गेले नाहीत, परंतु डिव्हाइस Geekbench तसेच BIS प्रमाणपत्र दोन्हीवर लिस्टेड केले गेले आहेत. हे लक्षात घेता, आपण अपेक्षा करु शकतो की, लवकरच रिलायन्स लाँचची अंतिम तारीख जाहीर करेल.

2GB रॅमसह JioBook लॅपटॉप लाँच होण्याची शक्यता

गीकबेंचवर दिसणारे लेटेस्ट मॉडेल MediaTek चिपसेट MT8788 सह येते. चिपसेट 2GHz पर्यंत क्लॉक केला जाऊ शकतो. CPU ला ARM Mali G72 सपोर्टेड आहे. लिस्टनुसार, लॅपटॉप 2GB रॅमसह येईल. चिपसेट फुलएचडी रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. तसेच JioBook त्याच्या एंट्री-लेव्हल लॅपटॉपसाठी कमी रिझोल्यूशन वापरण्याची शक्यता आहे.

Reliance JioBook चे स्पेक्स

ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे तर, नवीन लॅपटॉप Android 11 वर आधारित असेल असे लिस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. त्या तुलनेत, मागील लीक्स सूचित करतात की डिव्हाइस JioOS वर चालेल जे Android वर देखील आधारित असेल. लिस्टिंग 1178 चा सिंगल-कोर स्कोअर आणि 4246 चा मल्टी-कोर स्कोअर दर्शवते.

डिव्हाइसच्या मागील लिस्टमध्ये स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरद्वारे समर्थित मॉडेल देखील फीचर करण्यात आले होते. कनेक्टिव्हिटीसाठी हे मॉडेल स्नॅपड्रॅगन X12 4G सह येण्याची अपेक्षा आहे. नवीन JioBook लॅपटॉपमध्ये HDMI, USB-A सारखे कनेक्टिव्हिटी पोर्ट देखील उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, JioBook ला काही व्हेरिएंटमध्ये ड्युअल-बँड WiFi तसेच 4G LTE मिळू शकते.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(know Reliance JioBook laptop price, specs on launch details)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI