Zoho Mailचे ‘हे’ 5 फिचर्स वापरून पाहिले तर तुम्ही विसरून जाल Gmail, अकाउंट बनवण्याआधी जाणून घ्या सविस्तर

Zoho Mail भारतात वेगाने लोकप्रिय होत आहे. आज आपण या स्वदेशी ईमेल प्लॅटफॉर्मच्या पाच आश्चर्यकारक फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे Gmail पेक्षाही अधिक चांगले आहे . जर तुम्ही Gmail वरून Zoho मेलवर स्विच करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या पाच फिचर्सबद्दल माहिती असायला हवी.

Zoho Mailचे हे 5 फिचर्स वापरून पाहिले तर तुम्ही विसरून जाल Gmail, अकाउंट बनवण्याआधी जाणून घ्या सविस्तर
Zoho Mail
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Oct 10, 2025 | 7:12 PM

Arattai App निर्मिती करणाऱ्या झोहो कॉर्पोरेशनचा ईमेल प्लॅटफॉर्म असलेला झोहो मेल आता वेगाने लोकप्रिय होत आहे. भारतात अमेरिकन अ‍ॅप्स सोडून स्वदेशी अ‍ॅप्स स्वीकारण्याची चळवळ सुरू झाली आहे. बरेच लोकं जीमेलवरून झोहो मेलकडे वळत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही झोहो मेलवर त्यांचे अकाउंट स्विच केलं आहे. तर या झोहो मेलमध्ये गोपनीयता, मोफत सुविधा आणि व्यावसायिक हे नवीन फिचर्स लाँच केल्यामुळे अनेक लोकांचा कळ हा जीमेलवरून झोहो मेलवर वळत आहे. झोहोवर नवीन अकाउंट बनवण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की यात असे कोणते फिचर्स आहेत जे जीमेल प्लॅटफॉर्मपेक्षा झोहो मेल वेगळे आहे. आज आम्ही तुम्हाला झोहो मेलच्या पाच अद्भुत फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला आवडतील.

झोहो मेल फिचर्स

मोठे अटॅचमेंट: तुम्ही झोहो ईमेल वापरून एका वेळी 1 जीबी पर्यंतच्या फायलींचे अटॅचमेंट पाठवू शकता. जर फाइलची साईज 1 जीबी पेक्षा जास्त असेल, तर झोहो आपोआप या फायलींसाठी एक लिंक तयार करेल आणि ती ईमेलमध्ये जोडेल. मात्र तुम्ही जेव्हा जीमेलचा वापर करता तेव्हा त्यामध्ये फक्त 25 एमबी पर्यंतच्या फाईल मेल करता येतात. एकदा फाईलचा आकार 25 एमबी पेक्षा जास्त झाला की, जीमेल आपोआप ती फाइल गुगल ड्राइव्हवर अपलोड करते आणि एक लिंक तयार करते. तुम्ही ही लिंक शेअर करू शकता.

S/MIME सुरक्षा (S/MIME Security): मानक TLS एन्क्रिप्शन व्यतिरिक्त झोहो मेल S/MIME सपोर्ट देखील देते, ज्यामुळे वापरकर्त्याचे ईमेल अधिक सुरक्षित होतात.

स्मार्ट फिल्टर्स (Smart Filters):  झोहो मेलमधे स्मार्ट फिल्टर्सही देण्यात आलेले आहे. यामध्ये येणारे ईमेल स्कॅन होतात आणि हे मेल नोटिफिकेशन, न्यूजलेटर्स इत्यादी कॅटेगराइज करून फोल्डरमध्ये मुव्ह करतात. ज्यामुळे इनबॉक्समध्ये महत्त्वाचे ईमेल शोधणे सोपे होते.

ईमेल रिटेन्शन आणि ई-डिस्कव्हरी (Email Retention आणि eDiscovery): झोहो मेल कंपन्यांना सर्व ईमेलचा बॅकअप (रिटेन्शन) घेण्याची आणि कायदेशीर हेतूंसाठी (ई-डिस्कव्हरी) विशिष्ट मेल पुन्हा मिळवण्याची परवानगी देते. एकंदरीत, डेटा व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या गरजा असलेल्या कंपन्यांसाठी ही फिचर्स उत्तम आहेत.

एकात्मिक उत्पादकता टूल्स (Integrated Productivity Tools): झोहो मेल नोट्स, कॅलेंडर, संपर्क आणि बुकमार्क सारखी उपयुक्त टूल्स एकाच ठिकाणी एकत्र आणते, ज्यामुळे वेगवेगळ्या अॅप्समध्ये स्विच न करता काम सोपे होते.