अलर्ट! या अ‍ॅप्सच्या 300 कोटी युजर्सचा पासवर्ड लिक, लवकर बदला तुमची डिटेल्स

अलर्ट! या अ‍ॅप्सच्या 300 कोटी युजरचा पासवर्ड लिक, लवकर बदला तुमची डिटेल्स (Leak the password of 300 crore users of this app)

अलर्ट! या अ‍ॅप्सच्या 300 कोटी युजर्सचा पासवर्ड लिक, लवकर बदला तुमची डिटेल्स
300 कोटी युजर्सचा पासवर्ड लिक
| Updated on: Feb 23, 2021 | 6:23 PM

मुंबई : जीमेल, नेटफ्किक्स आणि लिंकेडीनच्या युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. जगभरात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या 300 कोटी युजर्सचा डेटा लिक झाला आहे. लिक झालेल्या डेटामध्ये युजर्सचा आयडी आणि पासवर्डचा समावेश आहे. डेटा लिक होणे हा सर्वात मोठा सुरक्षा भंग असल्याचे द सनने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यात जीमेल, नेटफ्लिक्स आणि लिंकेडीनच्या 300 कोटी युजर्सचा डेटा लिक झाला आहे. नेटफिक्स आणि लिंकेडीनचा डेटा लिक होण्याची ही पहिली घटना असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Leak the password of 300 crore users of this app)

1500 कोटी युजर्सला केले टार्गेट

अहवालानुसार हॅकर्सने जवळपास 1500 कोटी अकाउंट्स टार्गेट केले होते, यापैकी सुमारे 300 कोटी युजर्सचे आयडी आणि पासवर्ड हॅक करण्यात आले. यात लिंकेडीन आणि नेटफ्लिक्सचे 11.7 कोटी युजर्सचा डेटा समाविष्ट आहे. याशिवाय असेही म्हटले जातेय की, हॅकर्सने हा डेटा ऑनलाईन अपलोड केला असून ते याचा वापर दुसरे अकाउंट्स हॅक करण्यासाठी करु शकतात.

अकाऊंट हॅक झाले का हे कसे तपासाल?

जर तुम्हीही जीमेल, नेटफ्किक्स किंवा लिंकेडीन युजर आहात आणि तुमच्या अकाऊंट लिक झाले का हे जाणू इच्छित असाल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही सहज माहिती मिळवू शकता. यासाठी https://cybernews.com/personal-data-leak-check/ या लिंकवर जा. त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी टाका. जर तुमचा ई-मेल आयडी लिक झाला असेल तर तु्म्हाला ‘We haven’t found your email among the leaked ones’ हा मॅसेज येईल. जर आयडी लिक झाला नसेल तर ‘We haven’t found your email among the leaked ones’ असा मॅसेज येईल. याशिवाय आपले खाते लीक झाल्यास आपल्याला काय करावे लागेल याबाबतही आपल्याला वेबसाईटवर माहिती मिळेल. यात सांगितले आहे की, जर तुमचे अकाऊंट लिक झाले असेल तर तात्काळ तुमचे पासवर्ड बदला आणि नेहमी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा. यामुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित राहिल. (Leak the password of 300 crore users of this app)

 

 

इतर बातम्या

तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिली याची माहिती हवीये? ‘या’ 4 सोप्या स्टेप्सद्वारे मिळवा स्टॉकर्सची लिस्ट

WhatsApp वर नाही केलं हे काम तर 15 मेपासून बंद होतील मेसेज, नाही मिळणार ‘या’ सुविधा