AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिली याची माहिती हवीये? ‘या’ 4 सोप्या स्टेप्सद्वारे मिळवा स्टॉकर्सची लिस्ट

तुमची फेसबुक प्रोफाईल कोणी पाहिली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुमची Facebook प्रोफाईल कोणी पाहिली याची माहिती हवीये? 'या' 4 सोप्या स्टेप्सद्वारे मिळवा स्टॉकर्सची लिस्ट
फेसबुकवरचा तुमचा डेटा लीक तर होत नाहीय ना... जाणून घ्या ‘या’ वेबसाईटच्या माध्यमातून
| Updated on: Feb 23, 2021 | 2:57 PM
Share

मुंबई : फेसबुक हा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांचा अधिकांश वेळ त्यांच्या ऑनलाईन मित्रांसह आणि इतर गोष्टींमध्ये घालवतात. जगातली कोणतीही व्यक्ती, कुठूनही फेसबुकवरील आपली प्रोफाईल पाहू शकतो. आपली प्रोफाईल लॉक करुन ठेवण्याची सुविधा फेसबुकने दिली असली तरी किमान बेसिक प्रोफाईल तरी सर्वच जण पाहूच शकतात. त्यामुळे अनेकदा असा प्रश्न पडतो आपली प्रोफाईल कोणी पाहिली असेल, किंवा कोणती व्यक्ती आपली प्रोफाईल नेहमी स्टॉक करते. दरम्यान, याबाबतची माहिती फेसबुक आपल्याला देत नाही. तरी आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, तुमची प्रोफाईल कोणी पाहिली आहे, अथवा कोण पाहतंय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (know who viewed your Facebook profile Find stocker in 5 easy steps)

1. फेसबुक अकाऊंट ओपन करा

सर्वात आधी Facebook.com वर जाऊन वेबवर तुमचं फेसबुक अकाऊंट ओपन करा. यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राऊझरचा वापर करु शकता. तुम्ही तुमच्या फेसबुक पेज किंवा टाईमलाईनवर पोहोचलात की राईट क्लिक करा आणि व्ह्यू पेज सोर्सवर क्लिक करा.

2. पेज सोर्स कसा पाहणार

फेसबुक सोर्स पाहण्यासाठी राईट क्लिक करुन Page व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. पेज सोर्स ओपन झाल्यावर ‘CTRL + F’ वर टॅप करा.

3. सर्च बॉक्समध्ये ‘BUDDY_ID’ टाईप करा

आता सर्च बारवर जाऊन ‘BUDDY_ID’ टाईप करा आणि एंटर बटणवर क्लिक करा. तिथे ‘BUDDY_ID’ च्या शेजारी अनेक फेसबुक प्रोफाईल आयडी पाहायला मिळतील.

4. स्क्रीनवर प्रोफाईल पाहणाऱ्याचं नाव दिसेल

‘BUDDY_ID’ च्या शेजारी एक एक 15 अंकी कोड दिसेल तो कोड कॉपी करा आणि दुसऱ्या पेजवर फेसबुक ओपन करा. नव्या टॅबवर Facebook.com/15-digit code (फेसबुक डॉट कॉम स्लॅशच्या शेजारी तो 15 अंकी कोड पेस्ट करा) पेस्ट करुन एंटर बटणवर क्लिक करा. तुमची प्रोफाईल पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल.

फेबसुक प्रोफाईल अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  1. यासाठी सर्वात आधी तुम्हाला अॅप किंवा फेसबुक पेजवर जावं लागेल. वरच्या बाजूला जे टॅब आहेत तिथे टाईमलाईन आयकॉन दिसेल, हा आयकॉन घराप्रमाणे आहे. त्यानंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा आणि प्रोफाईल ओपन करा.
  2. अॅड स्टोरी बटनच्या शेजारी तीन डॉट मेनू दिसतील. हा मेनू ओपन करुन लॉक प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लॉक युवर प्रोफाईल फ्रॉम डिस्ट्रॅक्शन बाय युवर फ्रेंड्स (Lock your profile from distraction by your friends) या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पाहता येईल की तुमच्या प्रोफाईलमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत. आता प्रोसीड बटणवर क्लिक करुन प्रोफाईल लॉक करा.

प्रोफाल अनलॉक कशी कराल?

भविष्यात, जेव्हा तुम्हाला तुमची प्रोफाईल अनलॉक करायची असल्यास, फेसबुक तुम्हाला यासंबधित पर्याय देखील देतं. यासाठी, तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर परत जावे लागेल आणि नंतर तीन डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर अनलॉक प्रोफाइलवर क्लिक करावे लागेल.

(know who viewed your Facebook profile Find stocker in 5 easy steps)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.