AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lenovo ने भारतात दोन नवीन लॅपटॉप केले लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Lenovo ने भारतात नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. यामध्ये आयडियापॅड आणि योगा सिरीजच्या लॅपटॉपच्या अनेक नवीन मॉडेल्सचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये एआय फीचर्स आणि नवीनतम प्रोसेसर आहेत. चला त्यांच्या किंमती आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

Lenovo ने भारतात दोन नवीन लॅपटॉप केले लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
lenevoImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 07, 2026 | 8:56 PM
Share

लेनोवोने भारतीय बाजारपेठेत नवीन लॅपटॉपची पूर्ण रेंज सादर केली आहे, ज्यामध्ये IdeaPad 5 2-in-1 आणि Yoga सीरीजमधील अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन लॅपटॉप विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी तयार केले आहेत, जे दमदार कामगिरी आणि लवचिक डिझाइनच्या शोधात आहेत. कंपनीने यामध्ये अत्याधुनिक प्रोसेसर, एआय फीचर्स आणि प्रीमियम डिझाइन यांचा कॉम्बिनेशन देण्यात आले आहेज. किमतीच्या बाबतीत ही उपकरणे प्रीमियम सेगमेंटला टारगेट करतात.

किंमत आणि उपलब्धता

लेनोवोच्या नवीन IdeaPad आणि Yoga सिरीजच्या लॅपटॉपची किंमत भारतात प्रीमियम रेंज मध्य आहे. IdeaPad 5 2-in-1 ची किंमत 1,19,990 रूपयांपासून सुरू होते, तर Yoga 7a 2-इन-1 आणि Yoga Slim 7x ची किंमत 1,32,990 रूपयांपासून सुरू होते. Yoga 7i 2-in-1 Aura Edition ची किंमत 1,36,990 पासून सुरू होते आणि Yoga Slim 7i Ultra Aura Edition ची किंमत 1,99,990 पासून सुरू होते. हे सर्व मॉडेल्स लेनोवोच्या वेबसाइटवर, विशेष स्टोअर्समध्ये आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. तथापि Yoga Slim 7x ची विक्री 21 एप्रिल रोजी सुरू होईल, तर उर्वरित मॉडेल्सची विक्री आधीच सुरू झाली आहे.

IdeaPad आणि Yoga 7 सिरीजमध्ये एआय आणि लवचिक वैशिष्ट्ये मिळतील

Lenovo IdeaPad 5 2-in-1 आणि Yoga 7 2-in-1 सिरीज विशेषत: मल्टी वापरासाठी डिझाइन केलेली आहे. या लॅपटॉपमध्ये 360-डिग्री हिंज आहे, ज्यामुळे ते लॅपटॉप, टॅब्लेट, टेंट आणि स्टँड मोडमध्ये वापरता येतात. IdeaPad सिरीजमध्ये Intel Core Ultra Gen 3 प्रोसेसर आणि Lenovo Smart Note 3.0 सारखी एआय-आधारित वैशिष्ट्ये आहेत. Yoga 7 सिरीजमध्ये इंटेल आणि AMD Ryzen AI 400 प्रोसेसरचे पर्याय उपलब्ध आहेत. यात PureSight Pro OLED डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि डॉल्बी अॅटमॉस स्पीकर्स यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील आहेत, जी वापरकर्त्याला एक आकर्षक अनुभव देतात.

Yoga Slim 7 सिरीज पावर आणि उत्कृष्ट डिझाइन

Lenovo Yoga Slim 7 सिरीज ही पावर आणि पोर्टेबिलिटी यांचा कॉम्बिनेशन म्हणून सादर केली आहे. Yoga Slim 7i Ultra Aura Edition मध्ये मेटल अलॉय डिझाइन आणि हलके वजन आहे, ज्यामुळे त्याला एक प्रीमियम अनुभव मिळतो. यात Intel Core Ultra X9 प्रोसेसर आहे.Yoga Slim 7 मध्ये स्नॅपड्रॅगन X2 एलिट प्रोसेसर आहे, जो त्याच्या दीर्घ बॅटरी लाईफसाठी ओळखला जातो. कंपनीच्या मते, हा लॅपटॉप एका चार्जवर 31 तासांपर्यंत चालू शकतो. यात OLED डिस्प्ले, 9-मेगापिक्सलचा IR कॅमेरा आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यामुळे हे एक हाय-एंड डिव्हाइस बनते.

Follow Us
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या.
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने....
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.