AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lenovo ने भारतात त्यांचा नवीन टॅबलेट केला लाँच, जाणून घ्या याची किंमत आणि स्पेसिफिकेशन

लेनोवा कंपनीने त्यांचा एक नवीन एंट्री-लेव्हल लेनोवो टॅब भारतात लाँच केला आहे ज्यामध्ये डॉल्बी अॅटमॉस ड्युअल स्पीकर्स सारखी फिचर्स देखील आहेत. हे वाय-फाय आणि वाय-फाय + LTE प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण या टॅबलेटची किंमत आणि फिचर्स बद्दल जाणून घेऊयात...

Lenovo ने भारतात त्यांचा नवीन टॅबलेट केला लाँच, जाणून घ्या याची किंमत आणि स्पेसिफिकेशन
lenovo tab with 5100mah battery launched in india check price and specificationsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 01, 2025 | 12:30 AM
Share

लेनोवोने भारतात त्यांचा नवीन एंट्री-लेव्हल टॅबलेट लेनोवो टॅब लाँच केला आहे. यात मीडियाटेक हेलियो जी 85 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. या टॅबलेटमध्ये 10.1 इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे, जो 60 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. यात 5,100 एमएएच बॅटरी आहे जी 15 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. तर या टॅबमध्ये तुम्ही फक्त वाय-फाय ओनली आणि वाय-फाय + एलटीई व्हर्जनमधून निवडू शकतात. फोटो आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तसेच यात डॉल्बी अ‍ॅटमॉसने सुसज्ज ड्युअल स्पीकर सेटअप आहे.

लेनोवो टॅबची भारतातील किंमत

लेनोवो टॅबच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच यातील रॅम आणि स्टोरेज असलेल्या वाय-फाय + एलटीई मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय व्हर्जनची किंमत 11,998 रुपयांना उपलब्ध आहे. लेनोवो टॅबपोलर ब्लू कलर पर्यायात येतो. तसेच तुम्ही हा टॅब Lenovo.com, Lenovo एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि इतर ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करू शकता. हा नवीन टॅबलेट लेनोवो आयडिया टॅबसोबत लाँच करण्यात आला होता, ज्याचा बेस व्हेरिएंट 16,999 रुपये आहे.

लेनोवो टॅबचे स्पेसिफिकेशन्स

लेनोवो टॅब अँड्रॉइड 14 आधारित लेनोवो ZUI 16 वर चालतो आणि त्यात दोन वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा पॅचेस मिळतील. यात 10.1-इंचाचा फुल-एचडी (1200×1920 पिक्सेल) डिस्प्ले आहे, जो 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 400 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. डिस्प्लेला लो ब्लू लाइट ॲनिमेशन TÜV प्रमाणपत्र मिळाले आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G85 चिपसेट, 4 जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम आणि 128 जीबी ईएमएमसी स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी, लेनोवो टॅबमध्ये 8-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ट्यूनिंगसह ड्युअल स्पीकर्स आणि मेटल बॉडी डिझाइन आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.3 आणि वाय-फाय 5 सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. हा टॅबलेट एका क्लिअर केससह येतो ज्यामध्ये इनबिल्ट किकस्टँड आहे. लेनोवो टॅब हा स्टँडबाय मोडमध्ये ते डिजिटल फोटो फ्रेम किंवा घड्याळात रूपांतरित केले जाऊ शकते. लेनोवो टॅबमध्ये 5,100mAh बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचा आकार 9.5×235.7×154.5mm आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.