दाव्याचं काय घेऊन बसलात राव, अवघ्या 15 सेकंदात iPhone हॅक

Apple iPhone Hack | iPhone ला जगातील सर्वात सुरक्षित स्मार्टफोन म्हणून ओळखल्या जाते. पण आयफोनचे लेटेस्ट मॉडेल हँकर्सनी अवघ्या 15 सेकंदात हॅक केल्याने, सुरक्षेचे सर्व दावे फोल ठरले. यापूर्वीच्या आयफोन बाबत पण हाच अनुभव आला आहे. एथकिल हॅकर्सच्या या हात सफाने ॲप्पल पण चकीत झाले आहे.

दाव्याचं काय घेऊन बसलात राव, अवघ्या 15 सेकंदात iPhone हॅक
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 3:03 PM

नवी दिल्ली | 20 January 2024 : iPhone ची ओळख जगभरात सर्वात सुरक्षित स्मार्टफोन म्हणून करण्यात येते. खासगीपणा जपण्यात हा स्मार्टफोन अग्रेसर आहे. तसेच सुरक्षेच्या कारणामुळे हा स्मार्टफोन अनेक मोठे सेलेब्रिटी वापरतात. हा फोन कधीच हॅक करता येत नाही, असा दावा करण्यात येतो. पण एथिकल हँकर्संनी हा स्मार्टफोन अवघ्या 5 सेकंदात हॅक केल्याने, सुरक्षेचे सर्व दावे फोल ठरले. अवघ्या काही सेकंदात नवीन आयफोन हॅक झाल्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. या हात सफाने ॲप्पल पण चकीत झाले आहे.

चीनच्या हँकर्सची हात सफाई

तर चीनच्या हॅकर्सनी ही हात सफाई दाखवली. चीनच्या चेंगदू येथे तियानफू कप चे आयोजन करण्यात येते. यामध्ये व्हाईट हॅक हॅकर्स त्यांचे कौशल्य पणाला लावतात. 2021 मध्ये या कार्यक्रमात हँकर्सने अनेक आश्चर्यजनक कारनामे करुन दाखवले. दिग्गज कंपन्यांचे दावे अवघ्या काही सेकंदात या एथिकल हँकर्सनी धुळीस मिळवले. या वर्षी झालेल्या या स्पर्धेत तर Apple च्या सुरक्षेच्या दाव्याची हॅकर्सनी पिसं काढली.

हे सुद्धा वाचा

लेटेस्ट iPhone 13 Pro हॅक

स्थानिक मीडियातील वृत्तानुसार, iOS 15.0.2 वर चालणाऱ्या नवीन iPhone 13 Pro ला हँकर्सने हॅक करुन दाखवले. विशेष म्हणजे हजारो लोकांसमोर हा प्रयोग दाखवण्यात आला. हॅकर्सने अवघ्या 15 सेकंदात iPhone 13 Pro हॅक केला. यामध्ये सहभागी कुनलून लॅबच्या हॅकर्सने हा कारनामा करुन दाखवला. या चमूने Apple च्या सुरक्षेच्या दावा धुळीस मिळवला. या टीमने हा स्मार्टफोन कसा हॅक केला, याची माहिती दिली. त्यांनी सफारी बाऊजरमध्ये एका वल्नेरेबिलिटीचा फायदा घेत, हा स्मार्टफोन हॅक केला. iPhone 13 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे.

बंपर इनाम

कुनलून लॅबचे सीईओ Qihoo 360 चे माजी CTO होते. त्यांनी अवघ्या 15 सेकंदात आयफोन हॅक करण्याचा कारनामा करुन दाखवला. अर्थात केवळ याच एक टीमने ही मोहिम फत्ते केली नाही. तर Pangu ने पण iPhone 13 Pro हॅक करुन दाखवला. त्यासाठी या चमूला 300,000 डॉलरचे बक्षिस देण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.