WhatsApp चा वापर करून गर्लफ्रेंडला करा खूश, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर

Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डेला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा प्रभावीपणे वापर करू शकता. यामुळे तुमची जोडीदार एकदम खूश होईल. तसेच तुम्हाला तुमच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवणं देखील सोपं जाईल.

WhatsApp चा वापर करून गर्लफ्रेंडला करा खूश, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर
व्हॅलेंटाईन डेला WhatsApp च्या या फीचर्सचा वापर करून व्यक्त करा भावना, गर्लफ्रेंड होईल खूश
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:30 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असतंच असतं. जगभरातील संवादासाठी सर्वात पसंतीचं अ‍ॅप आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.तरुणाई या अ‍ॅपला सर्वाधिक पसंती देते.एखादा मेसेज आला की पुढे फॉरवर्ड करण्यापासून आपल्या प्रिय व्यक्तीला खूश करण्यासाठी रोजच्या रोज स्टेटस ठेवणं वगैरे होत असतं. आता व्हॅलेंटाईन वीक सुरु असून 14 फेब्रुवारी हा खास दिवस येणार आहे. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ही संधी तरुणाई सोडत नाही. पण अनेकदा आपल्या भावना व्यक्त करणं कठीण होतं. अशावेळी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता.व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फीचर्स असून त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन स्पेशल करू शकता.

असं कराल आपलं प्रेम व्यक्त

पिन चॅट- या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराचा नंबर लिस्टमध्ये सर्वात वर पिन करू शकता. अँड्रॉईड युजर्स फोन नंबरला टॅप करून होल्ड करत पिन करता येतं. तर आयफोन युजर्स चॅटवर डाव्या बाजूला स्वाईप करून चॅट पिन करु शकतात. यामुळे तुम्ही तिला किती महत्त्व देता हे अधोरेखित होईल.यामुळे प्रेम आणखी वाढेल.

इमोजी रिअ‍ॅक्शन- व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्यवस्थितरित्या वागवत नाही असा आरोप होतो. त्यामुळे यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे इमोजीचा वापर करा. यामुळे थोडक्यात तुमच्या भावना गर्लफ्रेंडपर्यंत पोहोचतील.

डिजिटल अवतार- व्हॉट्सअ‍ॅपवर डिजिटल अवतार तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगवर जाऊन तुम्ही डिजिटल कार्टून तयार करू शकता. जोडीदारासोबत असं चित्र केल्याने तुमच्यावर खूश होईल. तसेच चॅटमध्ये स्टीकर म्हणूनही वापरू शकता.

स्टेटस अपडेट- तुम्ही स्टेटस देखील अपडेट करू शकता. या माध्यमातून तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो दाखवू शकता. यामुळे तुमच्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील.

व्हॉईस मेसेज- जर तुमची पार्टनर विदेशात राहात असल्यास टेन्शन घेऊ नका. तुम्ही व्हॉईस मेसेज आधार घेऊ शकता. तुम्ही तुमचा आवाज या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोचवू शकता.

कस्टम नोटिफिकेशन टोन- व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी कस्टम नोटिफिकेशन टोन सेट करू सकता. या माध्यमातून ती तुमचा मेसेज किंवा कॉल सहज ओळखू शकते. त्यामुळे मेसेज किंवा कॉल मिस होण्याची शक्यता कमी राहील.

लाईव्ह लोकेशन- जर तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटण्याचा प्लान केला असेल तर आणि भेटू शकत नसाल तर व्हॉट्सअ‍ॅप तिला शोधण्यासाठी मदत करेल. लिमिटेड टाइमसाठी लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता.

पोल- व्हॉट्सअ‍ॅपवरील ही सर्वात मजेशीर फीचर आहे. पार्टनरला गिफ्ट देण्याबाबत संभ्रम असल्यास व्हॉट्सअ‍ॅप पोलची मदत घेऊ शकता. तसेच मित्रांकडून सजेशन घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.