कमीतकमी खर्चात बनवा तुमचं घर हायटेक! हे आहेत टॉप 3 स्मार्ट डिव्हाईस
टॉप 3 स्मार्ट डिव्हाईसच्या मदतीने तुम्ही तुमचं घर हायटेक बनवू शकता. या 3 स्मार्ट डिव्हाईसची किंमत अगदी परवडणारी आहे. जाणून घ्या.

आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण आज अनेक गोष्टी हाताळतोय. मग एसी चालवायचा असो, लाईट्स बंद करायच्या असोत किंवा घरातून बाहेर असताना गीझर बंद करायचा असो हे सर्व काही आता शक्य झालं आहे स्मार्ट गॅजेट्सच्या मदतीने. विशेष म्हणजे ही सगळी साधनं 1,000 रुपयांच्या आतही सहज उपलब्ध आहेत. चला पाहूया अशीच काही गॅजेट्स जी घराला बनवतील स्मार्ट.
1. स्मार्ट बल्ब : सर्वात आधी आपण बोलूया स्मार्ट बल्बबद्दल. हे बल्ब 1,000 रुपयांच्या आत सहज मिळतात. उदाहरणादाखल, PHILIPS WiZ Neo 12W B22 Wi-Fi & Bluetooth LED स्मार्ट बल्ब अमेझॉनवर केवळ 699 रुपयांना उपलब्ध आहे. या बल्बना WiFi आणि ब्लूटूथद्वारे कनेक्ट करता येतं. एकदा फोनच्या अॅपशी पेअर केलं की, तुम्ही वेगवेगळ्या रंगांमध्ये प्रकाश बदलू शकता. हे बल्ब Amazon Alexa आणि Google Assistant ला सपोर्ट करतात, त्यामुळे व्हॉइस कमांडद्वारेही ऑपरेट करता येतात. याशिवाय बल्ब म्युझिकशी सिंगही होतात आणि शेड्यूलनुसार ऑन-ऑफ करता येतात.
2. स्मार्ट प्लग : दुसऱ्या क्रमांकावर आहे स्मार्ट प्लग. QUBO 16A Wifi + BT स्मार्ट प्लग अमेझॉनवर सध्या 799 रुपयांमध्ये मिळतो. हे प्लग WiFi व ब्लूटूथवर चालतात आणि स्मार्टफोन अॅपशी कनेक्ट होतात. एकदा कनेक्ट झाल्यावर टीव्ही, गीझर, हीटर अशा कोणत्याही अप्लायन्सला स्मार्टपणे कंट्रोल करता येतं. गीझरला सकाळी ठराविक वेळी बंद व्हावं असं शेड्यूल करता येतं. घरात नसतानाही स्मार्ट अॅपद्वारे हे प्लग ऑन-ऑफ करता येतात. यांनाही Alexa आणि Google Assistant चा सपोर्ट आहे.
3. स्मार्ट कॅमेरा : तिसऱ्या क्रमांकावर आहे स्मार्ट होम कॅमेरा. MANOMAY 2MP Smart CCTV Wi-Fi कॅमेरा अमेझॉनवर सध्या 944 रुपयांत मिळतो. हा कॅमेरा WiFi वर चालतो आणि त्याला फोन अॅपशी जोडता येतं. त्यानंतर तुम्ही कुठूनही या कॅमेऱ्याचा फुटेज पाहू शकता. यातून तुम्ही घरात घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता आणि त्याच अॅपमधून थेट संवादही साधू शकता. यामध्येही Alexa सपोर्ट मिळतो.