AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फसवणुकीच्या अनेक दुकानांना आता लागणार ताळं; मोबाईलवर दिसणार नाव Caller चं

TRAI Caller Name : आतापर्यंत मोबाईल वापरकर्त्यांना थर्ड पार्टी ॲप Truecaller च्या मदतीने कॉलरची माहिती मिळत होती. पण मोबाईलधारकाचा डेटा लीक होण्याची भीती होती. कारण ट्रूकॉलर ॲप इन्स्टॉल करतेवेळी तुमच्याकडून अनेक गोष्टींसाठी परवानग्या घेतल्या जातात. मोबाईलमधील कॉन्टक्ट, मॅसेज, फोटोसहीत इतर माहिती ॲपला कळते.

फसवणुकीच्या अनेक दुकानांना आता लागणार ताळं; मोबाईलवर दिसणार नाव Caller चं
कॉलरचे नाव आता दिसणार
| Updated on: May 05, 2024 | 11:07 AM
Share

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही क्रमांक सेव्ह नसेल. तुम्हाला अनोळखी क्रमांकावरुन कॉल येत असेल, तर पहिला प्रश्न पडतो की हा फोन करतो तरी कोण? जर तुमच्या ट्रूकॉलर ॲप असेल तर समस्या नसते. पण अनेक जण सुरक्षेच्या कारणावरुन हे ॲप वापरत नाहीत. अशावेळी अनोळखी क्रमांक डोकेदुखी ठरतो. पण आता बोगस, फसवे कॉलर पकडल्या जातील. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना कॉलरचे नाव दाखवायचे निर्देश दिले आहेत. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही सुविधा सुरु झाल्यावर कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने कॉल केला तर त्याचे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.

थर्डपार्टी ॲप्सचा वापर

सध्या अनेक स्मार्टफोन युझर्स त्यांच्या मोबाईलमध्ये अनोळखी कॉलची माहिती घेण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करतात. त्यामध्ये अनेक युझर्स ट्रूकॉलरचा अधिक वापर करतात. थर्ड पार्टी ॲप्स त्यांची सेवा देण्यासाठी युझर्सकडून काही परवानग्या घेतात. त्यामध्ये कॉन्टॅक्ट, फोन गॅलरी, स्पीकर, कॅमेरा आणि कॉल हिस्ट्रीची माहिती घेण्यात येते. तुम्ही परवानगी न दिल्यास हे ॲप काम करत नाहीत. पण परवानगी दिल्यावर तुमचा डेटा किती सुरक्षित राहतो, याची खात्री देता येत नाही.

कॉलिंग नेम प्रेझेंटेशनची ट्रायल सुरु

TRAI ने देशभरातील दूरसंचार कंपन्यांना कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचर रोलआऊट करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर देशभरातील वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसायला लागेल. ट्रायनुसार, जर ही ट्रायल यशस्वी झाली तर कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचर देशभरात लागू होईल. वापरकर्त्यांना आता थर्ड पार्टी ॲपची गरज उरणार नाही.

या राज्यात ट्रायल सुरु

ट्रायने कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचरच्या चाचणीसाठी देशातील एका लहान सर्कलची निवड केली आहे. हरियाणात कॉलिंग नेम प्रेझेंटशन फीचरची चाचणी होत आहे. याच महिन्यात ही चाचणी सुरु होत आहे. इथं या चाचणीला यश आल्यानंतर ती सर्व देशभर लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाईलवर कॉलरचे नाव दिसू लागेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.