Maruti ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त धावते, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला मारूतीच्या एका खास कारविषयी माहिती देणार आहोत. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची रेंज इतकी जास्त आहे की तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन परत जाल, तरीही बॅटरी कारमध्ये शिल्लक आहे. हो. आता ही कार नेमकी कोणती आहे, याविषयीची माहिती जाणून घ्या.

वाहन घ्यायचं म्हणजे अनेकांना टेन्शनच येतं. कारण, इतकी मोठी वस्तू घरात आणायची म्हणजे ती परफेक्टच असावी, असंही काहींना वाटतं. विशेष म्हणजे आपण वाहन हे आपल्या सोयीसाठी घेत असतो. त्यामुळे त्याचा फायदा अधिक व्हावा, हेच सर्वांना वाटतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कारची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे ही कार मारुतीची आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.
भारतात मारुती ई-विटाराची प्रचंड क्रेझ आहे. ही इलेक्ट्रिक कार 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देते. या एसयूव्हीच्या इलेक्ट्रिक अवतारात उत्तम फीचर्स आहेत याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
मारुती ई-विटारा मारुती ई-विटारा कंपनीने मॉडर्न इलेक्ट्रिक एसयूव्ही बनवली आहे. यात ड्युअल स्क्रीन, स्प्लिट फोल्डिंग सीट, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, थ्री-पॉईंट सीट बेल्ट आणि आयसोफिक्स चाइल्ड सह नवीन ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.
याशिवाय ई-विटारामध्ये मिळणाऱ्या अॅडव्हान्स फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात ऑटो होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ट्रेल ड्राइव्ह मोड, हिल डिसेंट कंट्रोल, सिंगल झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, साइड अँड कर्टन एअरबॅग, हीटेड मिरर आणि अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टिम (एडीएएस) यांचा समावेश आहे.
मारुती ई-विताराच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, सिंगल मोटरसह 49 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक 144 एचपी पॉवर आणि सिंगल मोटरसह मोठा 61 किलोवॅट बॅटरी पॅक 174 एचपी पॉवर जनरेट करतो. या दोन्ही बॅटरी व्हेरियंटमधून निर्माण होणारा पीक टॉर्क 189 एनएम आहे.
मारुती सुझुकी ई-विटारा डायमेंशन
मारुती विटारा ईव्हीची लांबी 4,275 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,635 मिमी असून व्हीलबेस 2,700 मिमी आहे. याची ग्राऊंड क्लिअरन्स 180 मिमी असून व्हेरिएंटनुसार त्याचे वजन 1,702 किलो ते 1,899 किलो दरम्यान आहे.
आम्ही तुम्हाला मारुती विटारा ईव्हीची संपूर्ण माहिती वर दिली आहे. आता तुम्ही देखील वाहन खरेदी करताना, या माहितीचा उपयोग करू शकतात. तसेच प्रत्यक्ष कंपनीकडून ही माहिती घेतल्यास आणखी उत्तम. कारण, वेगवेगळ्या ऑफर्स येत असतात. त्या ऑफर्सही तुम्हाला कंपनीकडून माहिती होऊ शकतील.
लक्षात घ्या की, वाहन घेताना त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण, एकदा वाहन घेतल्यावर त्याचा खर्च सुरू होतो. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच वाहन खरेदी करा.
