लोकांना ‘या’ मेड इन इंडिया गाड्यांचे वेड, संधी सोडू नका, लगेच जाणून घ्या
देशात कारप्रेमींची कमतरता नाही. दर महिन्याला लाखो गाड्या विकल्या जातात. पण काही कार अशा आहेत ज्या लोक सर्वात जास्त खरेदी करत आहेत. त्यामुळे कंपनीच्या विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीची निर्यातही वाढली आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री एप्रिलमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 1,79,791 वाहनांवर पोहोचली आहे. मारुती सुझुकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने एकूण 1,68,089 वाहनांची विक्री केली होती. देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण विक्री एप्रिलमध्ये किरकोळ वाढून 1,38,704 वाहनांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,37,952 युनिट्स होती.
ऑल्टो आणि एस-प्रेसोसह मिनी सेगमेंटच्या कारची विक्री एप्रिलमध्ये घटून 6,332 युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 11,519 युनिट्स होती. बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट आणि वॅगनआर सह कॉम्पॅक्ट सेगमेंटच्या कारची विक्री मात्र वाढून 61,591 युनिटझाली आहे.
‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी
ब्रेझा, अर्टिगा, ग्रँड विटारा आणि एक्सएल 6 सह युटिलिटी वाहनांची विक्री 59,022 युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 56,553 युनिट्स होती. कंपनीने गेल्या महिन्यात ईको व्हॅनच्या 11,438 युनिट्सची विक्री केली, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 12,060 युनिट्सची विक्री झाली होती. हलकी व्यावसायिक वाहने विकणाऱ्या सुपर कॅरीची विक्री 3,349 युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 2,496 युनिट्स होती, असे कंपनीने सांगितले. गेल्या महिन्यात निर्यात 27,911 वाहनांची झाली होती, तर गेल्या वर्षी याच महिन्यात 22,160 वाहनांची निर्यात झाली होती.
निर्यात धोरणावर विश्वास
कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत किंचित वाढ झाली असली तरी निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. मारुती सुझुकीने एप्रिल 2025 मध्ये 27,911 वाहनांची निर्यात केली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 22,160 वाहनांची निर्यात झाली होती. ही वाढ वार्षिक आधारावर 25.9 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री कमी राहण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली होती, परंतु मारुती सुझुकी इंडिया नवीन आर्थिक वर्षासाठी उत्पादन आणि महसूल दोन्हीमध्ये वाढ वाढविण्यासाठी आपल्या निर्यात धोरणावर अवलंबून आहे.
मारुतीच्या गाड्यांना परदेशात मागणी
आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने एकूण 3,32,585 कारसह तीन लाख निर्यातीचा टप्पा ओलांडला. वर्षभरापूर्वी ही संख्या 2,83,067 युनिट्स होती. यात वार्षिक 17.49 टक्क्यांची वाढ दिसून येते. कार कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक निर्यातीचा आकडा आहे. मारुती सुझुकी ई-विटारा हे चालू आर्थिक वर्षात निर्यातीला चालना देणारे प्रमुख मॉडेल आहे. कंपनीने सांगितले की, कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या सुमारे 70,000 युनिट्सचे उत्पादन करण्याची योजना आखत आहे, यापैकी बहुतेक मॉडेल्स निर्यात केली जातील.
