विचारा… विचारा… काहीही विचारा, तुम्ही ‘मेटा’कुटीला याल पण मेटा नाही, Meta AI भारतात लॉंच ; ‘या’ सोशल मीडियाला फायदा

  गेल्‍यावर्षी मेटा एआय ( Meta AI ) ची घोषणा करण्यात आली होती आणि एप्रिलपासून  जगभरातील युजरसाठी ( Meta Llama 3  ) लामा 3 सह डिझाइन केलेले मेटा एआयचे आधुनिक व्‍हर्जन देखील सादर करण्यात आल्याचे मेटा कंपनीने म्हटले आहे.

विचारा... विचारा... काहीही विचारा, तुम्ही 'मेटा'कुटीला याल पण मेटा नाही, Meta AI भारतात लॉंच ; 'या' सोशल मीडियाला फायदा
Meta AI Introduced in india on WhatsAPP, Facebook, instagramImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 5:00 PM

फेसबुकची पॅरंट कंपनी मेटाने मोठी घोषणा केली आहे. आता मेटा आपली पहीली कृत्रिम बुद्धीमत्ता ( आर्टीफिशियल इंटेलिजन्स ( AI ) चॅटबोट मेटा Meta AI सॉफ्टवेअर देशात नुकतेच लॉंच केले आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात या फेसबुक कंपनीचे सह संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मेटा AI सॉफ्टवेअर बाजारात आणले होते. आता मेटा एआयचा वापर भारतातील युजरना फेसबुस, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि मॅसेंजरवर देखील करता येणार आहे. तेही ही अगदी मोफत, त्यामुळे भारतीय युजरला मोठा फायदा होणार आहे. हे सॉफ्टवेअर आता ChatGPT ला तगडी स्पर्धा देणार आहे. हे सॉफ्टवेअर AI Chatbot Llama 3 वर काम करते आणि कंपनीचे सर्वात प्रगत एआय मॉडेल असल्याचे फेसबुकच्या मेटा कंपनीचे सहसंस्थाप मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

मेटा एआयची प्रमुख वैशिष्ट्ये

● मेटा एआय हे जगातील आघाडीचे एआय असिस्‍टण्‍ट आता भारतात व्‍हॉट्सअॅप, फेसबुक, मॅसेंजर, इन्‍स्‍टाग्राम आणि meta.ai वर उपलब्‍ध आहे. मेटा एआय आतापर्यंतचे आमचे सर्वात प्रगत एलएलएम – मेटा लामा 3 ( Meta Llama 3 ) सह डिझाइन करण्‍यात आले आहे

● तुम्‍ही टास्‍क्स पूर्ण करण्‍यासाठी, कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यासाठी आणि विषयांबाबत सखोल माहिती मिळवण्‍यासाठी आमच्‍या अॅप्‍समधील फीड, चॅट्स अशा बाबींमध्‍ये मेटा एआयचा वापर करू शकता, ज्‍यासाठी तुम्‍ही वापरत असलेल्‍या अॅपमधून बाहेर पडण्‍याची गरज नाही

● तुम्‍हाला संगणकावर टास्‍क्‍स पूर्ण करायचे असतील तर meta.ai ला भेट द्या. गणितातील उदाहरणांबाबत सल्‍ला आवश्‍यक असल्‍यास, तसेच ईमेल साऊंड अधिक प्रोफेशनल करण्‍यास मदत पाहिजे असल्‍यास मेटा एआय मदत करू शकते

मेटा लामा 3 (Meta Llama 3 ) सह डिझाइन करण्‍यात आलेले मेटा एआय जगातील आघाडीचे एआय असिस्‍टण्‍ट असून ते आधीच तुमच्या फोनमध्‍ये उपलब्ध आहे.  12 हून अधिक देशांमध्‍ये हे संपूर्णपणे मोफत उपलब्‍ध आहे. त्यामुळे हे सर्व युजरच्या  खिशाला परवडणारे आहे. मेटा एआय भारतात इंग्रजी भाषेत लाँच होण्‍यास सुरूवात झाली आहे. तुम्‍ही टास्क पूर्ण करण्‍यासाठी, कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यासाठी आणि तुमच्‍यासाठी महत्त्वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टींसोबत कनेक्‍ट होण्‍यासाठी WhatsApp, Facebook, Messenger and Instagram मेटा एआयचा वापर करू शकता.

मेटा एआयचा असा उपयोग करा

मित्रांसोबत नाइट आऊटला जाण्‍याची योजना आखत आहात ? तुमच्‍यासाठी आणि तुमच्‍या मित्रांसाठी उत्तम व्‍ह्यूज आणि  शाकाहारी पर्याय असलेल्‍या रेस्‍टॉरंटची निवड करण्‍याकरिता व्‍हॉट्सअॅप ग्रुप चॅटमधील मेटा आयला विचारु शकता. वीकेण्‍ड असेल तर रोड ट्रिपचा आनंद घेता येईल अशा सर्वाेत्तम जागांबाबत मेटा एआयला विचारु शकता. परीक्षेसाठी तयारी करीत आहात ? तर तुमच्‍याकरीता बहुपर्यायी चाचणी तयार करण्‍यासाठी वेबवरील मेटा एआयला विचारा… तुमच्‍या नवीन सदनिकेमध्‍ये गृहप्रवेश करीत आहात ? तुम्‍हाला हवी असलेले आर्किटेक्चर सजावटीबाबत सुचविण्यास मेटा एआयला विचारु शकता. त्यामुळे तुम्‍ही फर्निचर खरेदीसाठी देखील एआय-निर्मित इमेजेस् तयार करू शकणार आहे.

फेसबुक फीडमध्‍ये मेटा एआय

तुम्‍ही फेसबुक फीडच्‍या माध्‍यमातून स्‍क्रॉलिंग करत असताना देखील मेटा एआयचा आनंद घेऊ शकता. तुम्‍हाला आवडणारी पोस्‍ट पाहायची आहे का? पोस्‍टमधील अधिक  माहितीसाठी मेटा एआयला विचारू शकता. तुम्‍ही उत्तरेकडील आइसलँडमधील आकाशातील ऑराचा फोटो पाहिला तर ऑरा बोरेलिस ( Aurora Borealis )  पाहण्‍यासाठी वर्षातील कोणती वेळ सर्वोत्तम आहे हे देखील मेटा एआयला विचारू शकता.

मेटा एआयच्‍या इमॅजिनने सर्जनशीलतेला वाव द्या

प्रत्‍यक्ष मेटा एआयसोबत किंवा ग्रुप चॅटमध्‍ये संवाद साधताना इमॅजिन शब्‍दाचा वापर करीत तुम्‍ही इमेजेस् तयार करु शकता आणि त्या शेअर करू शकता. इमॅजिन मेटाची टेक्‍स्‍ट-टू-इमेज जनरेशन क्लालीटी आहे.  जी तुमच्‍या सर्जनशीलतेला अधिक वाव देणार आहे. तुम्‍ही तुमच्‍या मुलाच्‍या बर्थडे पार्टीसाठी  मजेशीर निमंत्रण पत्रिका तयार करू शकता किंवा मित्रांसोबत मजेशीर इमेजेस् तयार करून त्या पोस्ट करु शकता. एवढंच नाही तर  तुम्‍हाला आवडणारी इमेज शोधायची असले तर  त्‍या इमेजमध्‍ये अॅनिमेशन तयार करण्‍यासाठी मेटा एआयला विचारा किंवा मेटा एआयला प्रॉम्‍प्‍ट बदलण्‍यास सांगत मित्रांसोबत इमेजला नवीन रूप देऊ शकता. मेटा हे ताकदवान लँग्‍वेज मॉडेलसह अधिक सर्वोत्तम केले आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.