AI फीचर्ससह Motorola चा नवीन स्मार्टफोन बाजारात, किंमत तर केवळ इतकी

Motorola कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन मिड रेंज स्मार्टफोन Moto Edge 50 Pro बाजारात उतरवला आहे. या स्मार्टफोनमध्ये काय विशेष आहे, कॅमेरा, बॅटरी आणि इतर काय काय फीचर्स आहेत. या स्मार्टफोनची किंमत पण अगदी तुमच्या अवाक्यात आहे, जाणून घ्या तपशील...

AI फीचर्ससह Motorola चा नवीन स्मार्टफोन बाजारात, किंमत तर केवळ इतकी
AIसह Motorola आला बाजारात
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 4:19 PM

Motorola ने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी Moto Edge 50 Pro 5G स्मार्टफोन आणला आहे. दमदार फीचर्ससह हा फोन बाजारात उतरविण्यात आला आहे. सध्या AI चा ट्रेंड सुरु आहे. मोटोरोला या फीचर्ससह हा स्मार्टफोन घेऊन आली आहे. एआय प्रो ग्रैड कॅमेरा सेन्सरसह हा स्मार्टफोन उतरविण्यात आला आहे. 1.5k रिझॉल्यूशन आणि 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. या अनेक वैशिष्ट्यासह हा स्मार्टफोन ग्राहकांच्या बजेटमध्ये येईल, असा कंपनीचा दावा आहे.

Flipkart करता येईल खरेदी

या स्मार्टफोनमध्ये एआय अडेप्टिव्ह स्टॅबलायाझेशन, ऑटो फोकस ट्रॅकिंग, एआय फोटो एन्हासमेंट इंजिन आणि टिल्ट मोड सारख्या एआय पॉवर्ड कॅमेरा फीचर्स मिळतील. मोटोरोला ब्रँडच्या या लेटेस्ट फोनला तुम्ही कंपनीच्या अधिकृत साईटवरुन आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरुन पण खरेदी करु शकता.

हे सुद्धा वाचा

Moto Edge 50 Pro Specifications :

  1. डिस्प्ले : मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाची 1.5k रिझॉल्यूशन्सचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तो 2000 निट्स पीक ब्राईटनेस देतो. हा मोबाईल तुम्हाला 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट, एचडीआर 10 प्लसची सुविधा देतो.
  2. चिपसेट : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोटो एज 50 प्रो स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 3 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
  3. कॅमरा सेटअप : फोनच्या मागील भागात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, सोबतच 13 मेगापिक्सल मॅक्रो-अल्ट्रा वाईट कॅमेरा आणि 30x हायब्रिड झूम सपोर्टसह 10MP टेलिफोटो लेन्स मिळेल. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सल कॅमरा सेन्सर देण्यात आला आहे.
  4. बॅटरी क्षमता : या फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ती 125 वॅट वायर्ड आणि 50 वॅट वायरलेस फास्ट चार्ज सपोर्ट करते.

Moto Edge 50 Pro Price in India : या फोनची किंमत तरी किती?

  1. मोटो एज 50 प्रो स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज (68 वॉट चार्जर सह) व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. या फोनला Luxe Lavender, Black Beauty आणि Moonlight Pearl कलर पर्यायात खरेदी करता येईल.
  2. 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज (125 वॉट चार्जरसह) व्हेरिएंटचा भाव 33,999 रुपये आहे. कंपनीकडून या फोनससह 2 हजार रुपयांच्या एका ऑफरचा फायदा पण मिळेल. त्यामुळे 68 वॅटचा व्हेरिएंट 29 हजार 999 रुपयांऐवजी 27 हजार 999 रुपयांना तर 125 वॅटचा स्मार्टफोन 33 हजार 999 रुपयांऐवजी 31 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल.

केव्हा मिळणार दमदार स्मार्टफोन

मोटोरोला कंपनीच्या या स्मार्टफोनची विक्री पुढील आठवड्यात 9 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून कंपनीच्या अधिकृत साईटवर आणि Flipkart वर सुरु होईल. लाँच ऑफरनुसार फोन खरेदीसाठी एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड EMI चा वापर करु शकता. त्यामुळे 2250 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.