Reliance कॅम्पसमध्ये Meta चे डाटा केंद्र; लग्नात मार्क झुकरबर्गशी झाली दिलजमाई

मीडियातील वृत्तानुसार, मार्क झुकरबर्ग आणि मुकेश अंबानी यांच्यात जामनगरमध्ये एका संयुक्त उपक्रमासाठी चर्चा झाली. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात ही करार पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. त्यामुळे देशात पहिल्यांदा मेटा त्यांचे डेटा केंद्र स्थापन करणार आहे.

Reliance कॅम्पसमध्ये Meta चे डाटा केंद्र; लग्नात मार्क झुकरबर्गशी झाली दिलजमाई
Meta चे Data Centre भारतात
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 2:49 PM

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांची मेटा ही मूळ कंपनी आहे. चेन्नईत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॅम्पसमध्ये मेटा भारतातील पहिले डेटा सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या मुख्य ॲपवर स्थानिक युझर्सच्या कंटेंटवरील प्रक्रिया सोपी होईल. याविषयीच्या वृत्तानुसार, मार्क झुकरबर्ग आणि मुकेश अंबानी या दोघांमध्ये याविषयीची चर्चा मागील मार्च महिन्याच्या सुरुवातीला झाली होती. अनंत अंबानी याच्य प्री-वेडिंग कार्यक्रमात या करारावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. युझर्सला आणि मेटाला याचा काय होईल फायदा?

10 एकराचा परिसर

  • ईटीच्या वृत्तानुसर, या परिसरातून मेटा आता देशभरातील अनेक ठिकाणचे 4-5 नोड्स कार्यान्वीत करु शकेल. परिणामी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ भारतात डेटा प्रोसेसिंग तेजीत होईल. सध्याच्या घडीला भारतीय युझर्सचा डेटा सिंगापूरमधील मेटाच्या डेटा सेंटरमधून येतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डेटा सेंटर भारतात आल्यास, कंटेट शिवाय, स्थानिक जाहिरात उद्योगाला पाठबळ मिळेल. त्यांना प्रभावी पणे या समाज माध्यमांवर सक्रिय होता येईल. याशिवाय डेटा सेंटर्ससाठीचा खर्च पण वाचेल.
  • चेन्नईच्या अंबत्तूर इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये 10 एकरचा परिसर आहे. कँसस ब्रुकफील्ड एसेट मॅनेंजमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिजिटल रियल्टी या तिघांच्या संयुक्त उपक्रमातंर्गत हा परिसर येतो. हा परिसर 100-मेगावॅट ऊर्जा क्षमता पूर्ण करणारा परिसर आहे. अर्थात या कराराविषयी दोन्ही बाजूंनी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फेसबुक कुठे तयार करणार डेटा सेंटर

हे सुद्धा वाचा
  1. तज्ज्ञांच्या मते, सरकार मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडलवर (AI) काम करत आहे. मेटा अशा विविध एआय मॉडेलवर काम करत आहे. भारतीय बाजारात ओपन सोर्स लार्ज लँग्वेज मॉडेल आधारीत उपक्रमाला भारतात अत्याधिक पसंती मिळाली आहे. त्यामुळे अशा इतर अनेक मॉडेलसाठी डेटा सेंटर सोयीस्कर ठरेल.
  2. तंत्रज्ञान संशोधन संस्था काऊंटरपॉईंट रिसर्चचे भागीदार नील शाह यांनी सांगितले की, मेटाचे लक्ष्य हे चेन्नई, मुंबई, हैदरबाद आणि दिल्ली एनसीआरसह मुख्य शहरांमध्ये ग्रीनफील्ड डेटा सेंटर तयार करणे हे आहे. ऑप्टिकल फायबरपासून ते वीजेपर्यंत हे केंद्र उपयोगी ठरतील. भारतात सध्या फेसबुकचे 314.6 दशलक्ष वापरकर्ते आहेत. तर इन्स्टाग्रामचे 350 दशलक्ष आणि व्हॉट्सॲपचे 480 दशलक्ष युझर्स होते. अमेरिकेपेक्षा भारतीय वापरकर्त्यांची संख्या दुप्पट आहे.
  3. केअरएज रेटिंग्जनुसार, भारताच्या डेटा सेंटर उद्योगांची क्षमता येत्या तीन वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता आहे. जागतिक डेटाचा 20 टक्के वाटा असतानाही भारताची डेटा सेंटरची क्षमता जगाच्या केवळ 3 टक्के आहे. मेटाच नाही तर गुगल आणि इतर मोठ्या टेक कंपन्या भारतात डेटा स्टोरेजसाठी प्रयत्नशील आहेत.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.