AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल यांचा iPhone झाला का अनलॉक? ईडीची टीम पोहचली Apple च्या कार्यालयात

अरविंद केजरीवाल यांना मार्च महिन्यात ईडीने नाट्यमयरित्या अटक केली. त्यानंतर ते ईडीच्या तुरुंगातून दिल्ली सरकार चालवत आहेत. आता पुन्हा त्यांची न्यायालयासमोर हजेरी आहे. त्यापूर्वीच एक ट्वीस्ट आला आहे. त्यांचा आयफोन अनलॉक करण्याचा ईडी प्रयत्न करत आहे, काय आहे नेमकं प्रकरण...

अरविंद केजरीवाल यांचा iPhone झाला का अनलॉक? ईडीची टीम पोहचली Apple च्या कार्यालयात
आयफोन झाला का अनलॉक
| Updated on: Apr 02, 2024 | 11:02 AM
Share

दिल्लीत मुख्यमंत्री आणि आपचे मुख्य अरविंद केजरीवाल हे गेल्या एक आठवड्यापासून सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) कोठडीत आहेत. त्यांच्यावर ईडीने प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पण या चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना उत्तर जाणून घेण्यासाठी आव्हानांचाय सामना करावा लागत आहे. त्यात सर्वात मोठे आव्हान आहे ते अरविंद केजरीवाल यांच्या अनलॉक आयफोनचे. आयफोनच पासवर्ड समोर येत नसल्याने ईडीने हा फोन उघडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु केले आहे. ईडीचे पथक ॲप्पल कार्यालयात ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे.

ईडीपुढे मोठे आव्हान

  • इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा iPhone, Switch Off केला आहे. त्याचा पासवर्ड पण ते कोणाला सांगत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने तातडीने फोन निर्मिती कंपनी ॲप्पलकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडे मदत मागितली.
  • Apple iPhone हा त्याच्या अति सुरक्षततेसाठी ओळखल्या जातो. Android स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone अधिक सुरक्षीत मानण्यात येतो. विना पासवर्ड इतक कोणीही मोबाईलमधील डेटा एक्सेस करु शकत नाही. केजरीवाल पासवर्ड सांगत नसल्याने आणि आयफोनमध्ये मद्य घोटाळ्याविषयीची अधिक माहिती मिळण्याची शक्यता लक्षात घेत ईडीने ॲप्पलकडे मदत मागितली आहे.
  • ॲप्पलने ईडीला काय दिले उत्तर

या वृत्तानुसार, ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या आयफोन संदर्भात ॲप्पलशी संपर्क केला. त्यांनी आयफोन उघडण्यासाठी कंपनीकडे सहकार्य मागितले. तेव्हा कंपनीने डेटा मिळविण्यासाठी पासवर्ड आवश्यक असल्याचे सांगितले. ईडीकडे केजरीवाल यांचे चार स्मार्टफोन आहेत. हे मोबाईल त्यांनी कारवाईदरम्यान जप्त केले आहेत.

केजरीवाल न्यायालयीन कोठडीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. राऊज एव्हेन्यू कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कथित मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांच्या अगोदर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत मद्य धोरण ठरविताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात आपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.