AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Moto G32 Sale : आजपासून फ्लिपकार्टवर Moto G32 सेल, फोनसह किंमत आणि ऑफर्सही जाणून घ्या…

Motorola स्मार्टफोनची विक्री आजपासून Flipkart वर ग्राहकांसाठी सुरू होणार आहे. सेल सुरू होण्यापूर्वी Moto G32 ची किंमत, फोनसह उपलब्ध ऑफर आणि हँडसेटच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या...

Moto G32 Sale : आजपासून फ्लिपकार्टवर Moto G32 सेल, फोनसह किंमत आणि ऑफर्सही जाणून घ्या...
फ्लिपकार्टवर Moto G32 सेलImage Credit source: social
| Updated on: Aug 16, 2022 | 11:48 AM
Share

नवी दिल्ली : Moto G32 Sale यासंदर्भात आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. हँडसेट निर्माता मोटोरोलाने (Motorola) गेल्या आठवड्यात आपल्या G32 मालिकेअंतर्गत Moto G32 स्मार्टफोन (Smartphone) भारतीय बाजारात लाँच केला. आजपासून Moto G32 ग्राहकांसाठी Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास या नवीन हँडसेटमध्ये फुल-एचडी रिझोल्यूशनसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरण्यात आला आहे. फ्लिपकार्ट सेल सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला या मोटोरोला ब्रँड स्मार्टफोनच्या फोनवर उपलब्ध असलेल्या किंमती, वैशिष्ट्ये आणि ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. याविषयी जाणून घ्या म्हणजे तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचं असल्यास तुम्हाला या माहितीचा फायदा होऊ शकेल. शिवाय तुम्हाला यात चांगली ऑफरही मिळू शकते. या सेलमध्ये अधिक ऑफर्स आहेत.

किती किंमत?

Moto G32 Motorola ने अलीकडेच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G32 लाँच केला आहे. आता कंपनी आजपासून फ्लिपकार्टवर या फोनची पहिली सेल सुरू करणार आहे. त्याची विक्री 16 ऑगस्ट रोजी म्हणजे आज सुरू होईल. Moto G32 स्मार्टफोनचा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन 12,999 रुपयांना उपलब्ध असेल. पण लाँच ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 11,749 रुपयांना खरेदी करू शकता.

ऑफर

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी केल्यास 1,250 रुपयांची सूट आहे.

Moto G32 ची प्रमुख वैशिष्ट्ये

  1. डिस्प्ले – या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आहे, जो फुल HD + डिस्प्ले देईल. यासोबतच यामध्ये 90 HZ चा रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे.
  2. प्रोसेसर – कंपनीने या फोनमध्ये 2.4 GHz Qualcomm Snapdragon 680 octa core प्रोसेसर स्थापित केला आहे.
  3. कॅमेरा – Moto G32 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा फॉरमॅट देण्यात आला आहे. यात 50 MP मेन रिअर कॅमेरा, 8 MP दुसरा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 MP तिसरा मॅक्रो कॅमेरा फ्लॅशलाइटसह आहे. फोनमध्ये 16 MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.
  4. OS – हा फोन नवीनतम Android 12 सह लॉन्च झाला आहे.
  5. • रॅम आणि इंटरनल स्टोरेज- या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच मेमरी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत मेमरी वाढवता येते.
  6. बॅटरी– यात 5000 mAh बॅटरी आहे. यासोबतच यामध्ये 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे.
  7. • इतर वैशिष्ट्ये – यात डॉल्बी अॅटमॉस वैशिष्ट्यासह स्टिरीओ स्पीकर आहेत. यासोबतच ब्लूटूथ, वाय-फाय, 3.5 एमएम जॅक अशा सर्व फीचर्सचाही समावेश आहे. त्याचे वजन 184 ग्रॅम आहे.
  8. • रंग – हा फोन मिनरल ग्रे आणि सॅटिन सिल्व्हर कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.