VIDEO : तब्बल सात कॅमेरांचा मोबाईल, पाहा किंमत…

VIDEO : तब्बल सात कॅमेरांचा मोबाईल, पाहा किंमत...


मुंबई : मोबाईल इंडस्ट्रीमध्ये दररोज नवनवीन फोन लाँच होत असतात. त्यामुळे प्रत्येक मोबाईल कंपनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हटके फिचर्स असलेले मोबाईल फोन लाँच करत असतात. सध्या भारतात शाओमी कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र शाओमीला टक्कर देण्यासाठी आता नोकिया कंपनी आपल्या नव्या फोनसह बाजारात उतरणार आहे. नवीन वर्षात नोकिया एक-दोन नाही तर तब्बल सात कॅमेरे असलेला मोबाईल फोन लाँच करणार आहे. नोकिया 9 प्युअरव्ह्यू (Nokia 9 Pureview)असं या फोनचं नाव आहे.

फिनिश कंपनी एचएमडी ग्लोबल पेंटालेन्सवाला स्मार्टफोन Nokia 9 Pureview वर गेले अनेक वर्ष काम करत आहे. मात्र आता या फोनचा एक व्हिडीओ लीक झालाय. टेक वेबसाईट माय स्मार्ट प्राईसने या फोनचा इंट्रो व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या फोन विषयी माहिती दिली आहे. या फोनचं विशेष आकर्षण म्हणजे या फोनमधील कॅमेरे आहेत. यामध्ये एकूण सात कॅमेरे दिलेले असून यापैकी पाच रिअर कॅमेरे तर दोन फ्रंट कॅमेरे आहेत.

 

कॅमेरा स्पेसिफिकेशन-

लीक रिपोर्टनुसार Nokia 9 Pureview चे रिअरवर 12-12 मेगापिक्सलचे दोन आणि 16-16 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तसेच एक कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. या सर्व कॅमेरातून एकाचवेळी फोटो काढता येणार आहे. फ्रंट कॅमेराचे स्पेसिफिकेशन अद्याक समोर आलेले नाही.

व्हिडीओनुसार, या फोनमध्ये युजर्स अॅडजस्टेबल बोकेडसोबत पोर्टेट मोड शॉट घेऊ शकतात. त्याशिवाय यामध्ये स्पेशल नाईट मोड पण असणार आहे. तसेच इतर फोनच्या तुलनेने या फोनचे कॅमेरे 10 पटीने जास्त लाईट कॅप्चर करतात.

किंमत किती?

या फोनला पहिले 2018 मध्ये लाँच करण्यात येणार होते. मात्र काही कारणांमुळे याची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली. आता आलेल्या माहितीनुसार हा फोन याच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच या फोनला फेब्रुवारीमध्ये बर्सिलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केले जाणार आहे.

फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सबद्दल कंपनीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण या फोनची किंमत 50 हजारांपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI