आता प्रत्येक कॉलवर दिसणार कॉलरचे खरेखुरे नाव, TRAI चा CNAP ला हिरवा झेंडा

TRAI चे हे पाऊल भारतात मोबाईल सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दिशेने एक क्रांतीकारी बदलाचे पाऊल ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. येत्या काही महिन्यात ही सेवा संपूर्णपणे लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलवर ही सेवा 'Truecaller' सारखी सरकारी सुरक्षा पुरवणार आहे.

आता प्रत्येक कॉलवर दिसणार कॉलरचे खरेखुरे नाव, TRAI चा CNAP ला हिरवा झेंडा
| Updated on: Oct 29, 2025 | 10:43 PM

TRAI ने कॉलरचे नाव दाखवणाऱ्या CNAP सेवेला मंजूरी दिली आहे. आता प्रत्येक कॉलवर केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे असली नाव देखील स्क्रीनवर दिसणार आहे. ही सेवा डिफॉल्ट रुपाने सर्व युजर्ससाठी चालू होणार आहे. परंतू यास बंद करता येऊ शकणार आहे.यामुळे फ्रॉड आणि स्पॅम कॉल्सवर लगाम लागणार आहे. आणि युजर्सना कॉलर आयडीमुळे कोणाचा कॉल आहे क्षणात समजणार आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अखेर कॉलरचे नाव दाखवणारी Calling Name Presentation (CNAP) सेवेला मंजूरी दिलेली आहे. आता मोबाईल युजर्सना केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे असली नाव देखील मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे.

काय आहे CNAP सेवा?

CNAP अर्थात Calling Name Presentation या तंत्राने जेव्हा कोणी तुम्हाला कॉल करेल तर तुमच्या मोबाईलवर त्या व्यक्तीचे रजिस्टर्ड नाव नंबरसह दिसणार आहे. याचा हेतू स्पॅम आणि फ्रॉड कॉल्सना रोखण्याचा आहे. युजर्सना त्यामुळे कॉलरची योग्य ओळख मिळेल आणि नको असलेल्या कॉलपासून सुटकाही मिळेल.

TRAI आणि DoT चा मोठा निर्णय

टेलिकॉम रेग्युलेटर TRAI ने 28 ऑक्टोबर 2025 रोजी Department of Telecommunications (DoT)च्या सुचनेवर आपले अंतिम उत्तर दिले आहे. दोघांनी मिळून आता अंतिम निर्णय घेतला आहे. या दोन संस्थांनी आता ठरवले आहे की डिफॉल्ट रुपाने सर्व मोबाईल युजर्ससाठी ही सेवा सुरु राहणार आहे. जर कोणी हीचा वापर करु इच्छीत नसेल तर तो ऑप्ट-आउट करु शकतो.

म्हणजे देशाच्या सर्व मोबाईल नेटवर्क्सवर CNAP आपोआप सक्रीय होईल आणि तेही कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेशिवाय होणार आहे.

कोणत्या नेटवर्क्सवर सुरु होणार सेवा ?

सुरुवातीला ही सेवा 4G आणि 5G नेटवर्क्सना लागू होणार आहे. 2G आणि 3G नेटवर्क्सवर हीला तांत्रिक अपग्रेड केल्यानंतर सुरु केले जाणार आहे. नवीन मोबाईल डिव्हाईसमध्ये CNAP सपोर्टला अनिर्वाय बनवण्याची तयारी सुरु आहे.

काय होणार फायदा?

1. फ्रॉड कॉल्सवर अंकुश:आता कोणत्याही बोगस वा नकली कॉलरपासून फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होईल.

2. यूजरची सुरक्षा: कॉलरचे नाव पाहून कॉल घ्यायचा की नाही ते युजरला ठरवता येणार आहे.

3. बिझनस कॉल्समध्ये पारदर्शकता: कंपन्या आपल्या असली ब्रँडच्या नावाने कॉल करु शकतील.त्यामुळे ग्राहक विश्वास ठेवू शकतील.

गुप्ततेवर प्रश्नचिन्ह ?

काही तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला आहे. कॉलरचे नाव दाखवल्याने प्रायव्हसीवर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतू ट्रायचे म्हणणे आहे की ही माहिती कॉलरच्या नेटवर्क डेटाबेसमधून घेतली जाईल, अनेक एप किंवा थर्ड पार्टीकडून कडून घेतली जाणार नाही.

कोणाला करावी लागणार तयारी ?

TRAI च्या आदेशानंतर आता टेलिकॉम कंपन्या आणि मोबाईल निर्माता कंपन्या दोन्हींना या सेवेच्या अनुरुप तंत्रात बदल करावा लागणार आहे सरकार लवकरच याची अंतिम रुपरेषा ठरवणार आहे.