मोबाईलमध्ये पत्नीचे नाव ‘जाडी’ म्हणून सेव्ह केल्याने घटस्फोटापर्यंत गेले प्रकरण,कोर्टाने दिला धक्कादायक निकाल
पत्नीचे नाव अनेक जण मोबाईलमध्ये वेगवेगळ्या टोपण नावाने किंवा लाडाच्या नावाने सेव्ह करत असतात.एका माणसाने त्याच्या पत्नीचे नाव मोबाईलमध्ये ‘जाडी’ म्हणून ठेवल्याने प्रकरण वाढून घटस्फोटापर्यंत पोहचले आणि कोर्टाने नंतर धक्कादायक निकाल दिला आहे

तुर्कीत विचित्र प्रकरण घडले आहे.येथे एका तरुणाने त्याच्या पत्नीचे नाव मोबाईलमध्ये ‘टॉम्बिक’ म्हणजे ‘जाडी’असे सेव्ह केले होते. त्यावरुन पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस दिली. छोट्या किरकोळ स्वरुपाच्या नेहमीच्या पती-पत्नीच्या भांडणाची आता इमोशनल अब्युजची केस झाल्याने तेथील सर्वोच्च न्यायालयाने यास भावनात्मक हिंसा मानून पतीच्या विरोधात निकाल दिला आहे.
पतीने पत्नीला अपमानजनक मॅसेज पाठवले होते त्यामुळे ही केस मजबूत झाली. उशाकच्या फॅमिली कोर्टातून ही लढाई सुप्रीम कोर्टा पर्यंत पोहचली. तेथे पतीची चुकी असल्याचा निर्णय झाला. पत्नीने तलाक सोबत भरपाई देखील मागितली आणि कोर्टाने पतीला आर्थिक आणि मानसिक क्षतीपूर्ती करण्याचा आदेश दिला. हा निर्णय ऐतिहासिक ठरला कारण आता फोनमध्ये कॉन्टॅक्ट नाव देखील पुरावा मान्य होणार आहे.
कोर्टाने दिला अनोखा निकाल
कोर्टाने म्हटले की पत्नीला ‘जाडी’ म्हणून तिचे नाव सेव्ह करणे केवल मस्करी होत नसून इमोशनल व्हायलन्स आहे त्यामुळे नाते तुटू शकते. तुर्कीत कायद्या क्रुर बिहेवियर वा मेंटर अब्युज तलाकसाठी ग्राऊंड आहे. आणि कोर्टात मॅसेजसह कॉन्टॅक्ट नावालाही पुरावा मानले गेले. पतीने पत्नीवर काऊंटर केस करुन तिच्यावर अनफेथफुलनेसचा आरोप लावला. परंतू कोर्टाने पुराव्या आधारे पतीलाच दोषी ठरवले. सुप्रीम कोर्टाच्या 2nd सिव्हील चेंबरने स्थानिक कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. या केसवरुन हे स्पष्ट होते की छोट्याशी गोष्टीही जर अपमानजनक असतील तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावर आता नवीनच वाद सुरु आहेत की प्रेमाने देखील पत्नीला त्याने ‘जाडी’ म्हटले असू शकते. नेहमी अपमान करण्यासाठी जाडी कसे म्हटले जाऊ शकते !
सोशल मीडियावर झडला वाद
सोशल मीडियावर ही केस व्हायरल होत आहे. काही लोकांनी म्हटले आमच्या फोनमध्ये मजेशीर नावे सेव्ह केली आहेत परंतू तलाकपर्यंत पोहचलो नाही ! एका युजरने लिहीले की जाडी तर प्रेमानेही म्हटले जाते, परंतू हेतू महत्वाचा आहे. तर दुसऱ्या एकाने लिहीलेय की अपमानाला हलक्यात घेऊ नका हे तर अब्युज आहे.जेलची अफवा पसरली परंतू कोर्टाने केवळ दंड आणि नुकसान भरपाई दिली, कोणीही सजा केली नाही. ही केस आता तुर्कीच्या वुमेन्स राईट्ससाठी एक उदाहरण बनणार आहे. जेथे इमोशनल अब्युजला सिरियस घेतले आहे. भारतातही अशा केस वाढत आहेत. परंतू नाव सेव्ह केल्याने तलाक मिळून दुर्लभ आहे. यावरुन हे स्पष्ट होते की नात्यात शब्दांचा फरक ओळखा, अन्यथा छोटी गोष्ट मोठी होईल.
