भारताच्या टॉप गेमर्ससोबत पंतप्रधानांची गुप्तगू; स्वतः पण केला गेम खेळण्याचा प्रयत्न

Game on ft. NaMo : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. मोदी है तो मुमकिन है, असा नारा त्यामुळेच त्यांचे चाहते देतात. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुद्धा पंतप्रधानांनी ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील दमदार खेळाडूशीं हितगुज साधले.

भारताच्या टॉप गेमर्ससोबत पंतप्रधानांची गुप्तगू; स्वतः पण केला गेम खेळण्याचा प्रयत्न
टॉप गेमर्ससोबत पंतप्रधानांची मन की बात
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 5:10 PM

लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळीला रंग चढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा खास शो सध्या देशभरात चर्चेत आहे. पंतप्रधानांनी ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीजमधील नामचिन खेळाडूंशी हितगुज साधले. इतकेच नाही तर त्यांनी अनेक Games खेळून पण पाहिले. Gaming Industry मधील क्रिएटर्सशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी टॉप प्लेयर्स ig_Mortal, अनिमेश अग्रवाल उर्फ 8bit Thug, मिथिलेश पाटणकर उर्फ Mythpat, पायल धारे उर्फ Payal Gaming, अंशू बिष्ट उर्फ Gamerfleet, तीर्थ मेहता आणि गणेश गंगाधर या खेळाडूंशी दिलखुलास संवाद साधला. गेमिंग इंडस्ट्रीतील बारकावे समजून घेतले. आता त्यांचा निशाणा कोणावर आहे आणि ते कोणाचा गेम करणार, हे वेगळं सांगायला हवं का?

युट्यूबवर ट्रेलर

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुआयामी म्हणून ओळखले जातात. ते सहज कोणाशी संवाद साधू शकतात. गेमिंग इंडस्ट्रीतील सध्याच्या दिग्गज खेळाडूंशी त्यांनी चर्चा केली. याविषयीचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याचा एपिसोड लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या YouTube चॅनलवर रिलीज होईल. त्यापूर्वी त्याचा ट्रेलर दाखविण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान या तरुणांशी चर्चा करताना, ई-स्पोर्ट्सविषयीचे बारकावे समजून घेताना दिसून येतात.

गेमर्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर या गेमर्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयीची माहिती शेअर केली. त्यांनी या भेटीबद्दल त्यांच्या समाज माध्यमावर सविस्तर वृ्त्तांत कथन केला आहे. त्यानुसार, या खेळाडूंना या गेमिंगबद्दल पंतप्रधान माहिती घेताना दिसत आहेत. गेमिंग आणि गॅम्बलिंगमधील अंतर काय, गेमर्सला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याविषयीची विचारणा करण्यात आल्याचे दिसते.

13 एप्रिल रोजी एपिसोड रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गेमिंग इंडस्ट्रीजमधील या दिग्गजांमधील ही चर्चा येत्या 13 एप्रिल रोजी रिलीज होईल. अग्रवाल आणि पाटणकर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. त्यांच्या कल्पना या गेमिंग उद्योगाला पूर्णपणे बदलवून टाकतील, असा विश्वास या गेमर्संना वाटत आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.