चालत्या ट्रेनमध्ये ATM? प्रवाशांसाठी रेल्वेने आणली भन्नाट सोय, जाणून घ्या कसे काढाल पैसे!
आता भारतीय रेल्वेकडून ट्रेनमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरज भासल्यास प्रवाशांना चालत्या ट्रेनमधून पैसे काढता येतील. भारत रेल्वेची सुविधा नेमकी काय? आणि कोणत्या ट्रेनमध्ये प्रवासी पैसे काढू शकतील पैसे जाणून घ्या.

रेल्वेतून प्रवास करताना अशी वेळ अनेकदा येते, जेव्हा अचानक रोख पैशांची गरज भासते. कधी ट्रेनमध्ये विक्रेता येतो, तर कधी स्टेशनवर थांबताना काही खरेदी करायचं असतं, पण खिशात पुरेसा कॅश नसतो आणि नेटवर्कमुळे ऑनलाइन व्यवहारही होत नाही. अशा अडचणीची वेळ प्रत्येक प्रवाशाने किमान एकदा तरी अनुभवली असेलच!
याच समस्येवर तोडगा काढत भारतीय रेल्वेने आता प्रवाशांसाठी एक अनोखी सुविधा सुरू केली आहे. आता ट्रेनच्या प्रवासादरम्यान, धावत्या गाडीत बसूनच तुम्हाला एटीएम मशीनद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे! या उपक्रमामुळे रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.
कोणत्या ट्रेनमध्ये मिळणार आहे ही सुविधा?
सध्या ही खास एटीएम सेवा नाशिक आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘पंचवटी एक्सप्रेस’मध्ये सुरू करण्यात आली आहे. पंचवटी एक्सप्रेसच्या एसी डब्यात बँक ऑफ महाराष्ट्रने एटीएम मशीन बसवले आहे. यामुळे या डब्यातील प्रवासी, कोणत्याही वेळी आपल्या खात्यातून थेट कॅश विड्रॉ करू शकतात.
हे एटीएम ट्रेनमधील प्रवाशांसाठी विशेषतः उपयोगी आहे, जेव्हा नेटवर्क नसल्यामुळे UPI किंवा इतर डिजिटल पेमेंट करणे अशक्य होते. प्रवाशांनी फक्त आपले डेबिट कार्ड वापरून सहज पैसे काढायचे आणि गरजेनुसार खरेदी करायची — इतकं सोपं!
‘फास्ट कॅश एक्सप्रेस’
भारतीय रेल्वेने या अनोख्या उपक्रमाला ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’ असं नाव दिलं आहे. कारण या सुविधेमुळे पैसे काढण्यासाठी एखाद्या स्टेशनवर थांबण्याची गरज उरत नाही आणि प्रवासात वेळ वाचतो. एटीएम मशीनमुळे ट्रेनमधील प्रवासी अगदी कोणत्याही क्षणी गरजेप्रमाणे कॅश विड्रॉ करू शकतात.
अजून कुठे सुरू होणार ही सुविधा?
भुसावळ रेल्वे विभागाने हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. सध्या काही मार्गांवर नेटवर्कची मर्यादा असल्यामुळे थोड्याफार अडचणी आल्या असल्या तरी, यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही सुविधा इतर गाड्यांमध्येही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासन आणि बँक यांच्यातील सहकार्यामुळे ही सेवा आणखी सुधारली जाईल आणि भविष्यात देशातील अनेक एक्सप्रेस गाड्यांमध्ये एटीएम सुविधा पाहायला मिळेल.
आता भारतीय रेल्वेकडून ट्रेनमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरज भासल्यास प्रवाशांना चालत्या ट्रेनमधून पैसे काढता येतील. भारत रेल्वेची सुविधा नेमकी काय? आणि कोणत्या ट्रेनमध्ये प्रवासी पैसे काढू शकतील पैसे जाणून घ्या.
