AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, ‘या’ दिवशी होणार लाँच, जाणून घ्या नव्या फोनची खासियत

OnePlus 9RT लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत मोठा खुलासा झाला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजार रुपये असू शकते,

OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, 'या' दिवशी होणार लाँच, जाणून घ्या नव्या फोनची खासियत
Oneplus 9rt
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 4:50 PM
Share

मुंबई : OnePlus 9RT लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत मोठा खुलासा झाला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजार रुपये असू शकते, कंपनीने याबद्दल अद्याप पुष्टी केलेली नसली तरी काही अहवालांमध्ये या फोनच्या किंमतीबाबत माहिती समोर आली आहे. अलीकडेच या आगामी फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. गिझ्मोचायनाने म्हटले आहे की, वनप्लसने चीनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ज्यात वनप्लस 9 आरटीच्या लॉन्चची तारीख 13 ऑक्टोबर असल्याचे नमूद केले आहे. मात्र, हा फोन भारतात लॉन्च करण्याबाबत अद्याप कोणतीही तारीख उघड झालेली नाही.

वनप्लस कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत नवीन सिरीज सादर करते आणि वर्षाच्या चौथ्या तिमाहीत त्या सिरीजसोबत टी जोडून नवी सिरीज सादर केली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने वनप्लस 9 सिरीज सादर केली, ज्यामध्ये बेस मॉडेल वनप्लस 9 आर होते आणि लवकरच वनप्लस 9 आरटी देखील लॉन्च होणार आहे. यासोबत अजून किती मॉडेल्स लाँच केले जातील याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी तुम्ही जर नवीन अफवांवर विश्वास ठेवलात तर वनप्लसच्या या आगामी फोनची किंमत CNY 2000 (23,000 रुपये) असेल, जी या फोनच्या बेस मॉडेलची किंमत आहे. तर या फोनच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत CNY 3000 (35000 रुपये) असू शकते.

संभाव्य फीचर्स

OnePlus 9RT च्या लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च केलेल्या OnePlus 9R सारखाच असेल. नवीन लीक्समध्ये, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी Weibo चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात OnePlus 9RT चे फीचर्स उघड केले आहेत. OnePlus 9RT ची किंमत 34,000 रुपये असू शकते. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41,000 रुपये इतकी असेल. याशिवाय जर तुम्ही 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंट घेत असाल तर तुम्हाला 44,000 रुपये मोजावे लागू शकतात.

या फोनच्या नावानुसार, ही वनप्लस 9 आर ची एक ट्वीक्ड आवृत्ती असेल जी वनप्लस 9 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर OnePlus 9RT ला OnePlus 9R सारखे 120Hz AMOLED पॅनल मिळेल. यात 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आणि यासोबत 4500mAh ची बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त, त्याला स्नॅपड्रॅगन 870 ची हायर-बिन्ड आवृत्ती मिळेल. दुसरीकडे, जर आपण कॅमेराबद्दल बोललो तर या फोनला वनप्लस नॉर्ड 2 प्रमाणे 50 मेगापिक्सलचा सोनी IMX766 सेन्सर मिळेल.

सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, हा पहिला वनप्लस फोन असेल जो Android 12 ऑउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड OxygenOS 12 वर चालेल. हे ColorOS अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आणेल. OxygenOS 12 मध्ये गुगलचा नवीन मटेरियल यू एस्थेटिंक मिळेल. यासह, अहवालात असेही म्हटले गेले आहे की, कंपनी ऑक्सिजन ओएस 12 ची बीटा आवृत्ती लॉन्च करण्याची योजना आखत होती, परंतु अनेक बग्समुळे त्याचे लाँचिंग थांबवण्यात आले. कंपनीची सॉफ्टवेअर टीम या बगचे निराकरण करण्याचे काम करत आहे. तथापि, वनप्लस 9 आरटी किंवा ऑक्सिजन ओएस 12 च्या क्लोज्ड बीटा वर्जनबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....