OnePlus Nord Buds 4 इअरबड्स लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या तारीख आणि फिचर्स
वनप्लस लवकरच भारतात त्यांचा नवीन वनप्लस नॉर्ड बड्स 4 वायरलेस इअरबड्स लाँच करणार आहे. हे नवीन बड्स कंपनीच्या नॉर्ड बड्स 4 प्रो लाइनअपमध्ये सामील होतील. चला तर मग हे बड्स कोणत्या दिवशी भारतीय बाजारपेठेत सादर होतील तसेच त्यात कोणते फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात.

OnePlus Nord Buds 4 इअरबड्स लवकरच भारतात लाँच होणार आहे अशी घोषणा कंपनीने शुक्रवारी केली. हे नवीन ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरबड्स 19 मार्च रोजी भारतात लाँच झालेल्या वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो च्या लाईनअपमध्ये सादर करणार आहेत. तर वनप्लस टेक कंपनीने आगामी वनप्लस नॉर्ड बड्स 4 चे डिझाइन देखील उघड केले, जे प्रो मॉडेलसारखेच दिसते. टीझरनुसार हे इअरबड्स सिलिकॉन इअर टिप्ससह इन-इअर डिझाइनमध्ये येतील. याशिवाय, लवकरच लाँच होणाऱ्या या TWS साठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील देशात सुरू झाली आहे, ज्यावर त्याच्या उपलब्धतेबद्दलची माहिती समोर आली आहे.
OnePlus Nord Buds 4 लवकरच भारतात लाँच होणार
एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये टेक कंपनीने सांगितलेलं आहे की नवीन OnePlus Nord Buds 4 लवकरच भारतात लाँच होतील. या आगामी इअरबड्ससाठी ॲमेझॉनवर एक समर्पित मायक्रोसाइट देखील सुरू झाली आहे, ज्यामुळे हे निश्चित झाले आहे की वनप्लसचे हे बड्स या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे देशात विक्रीसाठी उपलब्ध असतील. या घोषणेचा एक भाग म्हणून कंपनीने TWS च्या डिझाइनची झलक दाखवली. सध्या हे निश्चित झाले आहे की वनप्लस नॉर्ड बड्स 4 भारतात किमान एका टील (teal) रंगाच्या पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
वनप्लसने अद्याप या कलर ऑप्शनचे अधिकृत मार्केटिंग नाव जाहीर केलेले नाही, परंतु टीझरमध्ये नॉर्ड बड्स 4 इन-इअर डिझाइनचे आणि प्रत्येक इअरबडच्या टोकाला सिलिकॉन इअरटिप्ससह दिसत आहेत. शिवाय वायरलेस चार्जिंगसाठी दोन पोगो पिन कनेक्टर्ससह त्यांना तुलनेने लहान स्टेम असू शकतो. याव्यतिरिक्त, इअरबड्सच्या मागील बाजूस एक इंडेंट दिसत आहे ज्याचा वापर जेश्चर कंट्रोल्ससाठी केला जाऊ शकतो. वनप्लस नॉर्ड बड्स 4 सोबत पेबल-शेप्ड चार्जिंग केस मिळेल.
कंपनीने 19 मार्च रोजी वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो लाँच केल्यानंतर काही महिन्यांतच आणखीन एका नवीन इअरबड्सची घोषणा करण्यात आली आहे. भारतात नॉर्ड बड्स 4 प्रो ची किंमत सध्या 3 हजार 999 इतकी असून ते रेडियंट ग्रे आणि रेव्हन ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. आठवण करून द्यायची झाल्यास, या इअरबड्समध्ये टायटॅनियम कोटिंग असलेले 12 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. तसेच यामध्ये TWS ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि ट्रान्सपरन्सी मोडलाही सपोर्ट आहे.
वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो च्या प्रत्येक इअरबडमध्ये 62mAh बॅटरी आहे. चार्जिंग केसमध्ये 530mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की ANC बंद असताना एकूण 54 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. नॉर्ड बड्स 4 प्रो मध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP55 रेटिंग देखील आहे.