AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sam Altman : मला ते व्यसनच लागलं होतं… OpenAI च्या CEO ची धक्कादायक कबुली; दिवस रात्र…

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांना लागलेल्या व्यसनाबद्दल धक्कादायक कबुली दिली. सोरा (Sora) प्रोजेक्टसाठी वापर सुरू केल्यानंतर, हे व्यसन इतके वाढले की तासन्तास स्क्रोलिंग करत होते. दहा मिनिटांचे स्क्रोलिंग कधी तासांत बदलले कळलेच नाही. या व्यसनाची जाणीव झाल्यावर अखेर त्यांनी मोठं पाऊल उचलत महत्वाचा निर्णय घेतला.

Sam Altman : मला ते व्यसनच लागलं होतं... OpenAI च्या CEO ची धक्कादायक कबुली; दिवस रात्र...
सॅण ऑल्टमन यांची धक्कादायक कबुली
| Updated on: Jul 27, 2026 | 2:36 PM
Share

जेव्हा आपण फोनवरून एखादं रील किंवा शॉर्ट्स पहायला सुरूवात करतो, त्यानंतर नकळत तासन् तास स्क्रोलिंग सुरूच राहतं. सोशल मीडियाचे हे व्यसन केवळ सामान्य जनतेपुरतं किंवा ठराविक लोकांपर्यंतच मर्यादित आहे असं नाही, तर कित्येक मोठ्या लोकांनाही याची सवय लागते, असं समोर आलं आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण OpenAI सारख्यामोठ्या कंपनीचे CEO यांनाही सोशल मीडियाची सवय झालेली, त्यांना ते व्यसनच लागलं होतं. OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनीच या भयानक सवयीचा खुलासा केला. त्यांच्या या कबुलीने अनेक जण आश्चर्यचतिक झाले आहेत, पण तेच खरं आहे.

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये ऑल्टमन यांनी याद्दल सांगितलं. ते जेव्हा , OpenAI च्या AI-आधारित व्हिडिओ जनरेशन प्रकल्प Sora वर काम करत होते, तेव्हाच त्यांना TikTok चं व्यसन लागलं होतं. खरंतर हा प्रोजेक्ट, TikTok आणि Instagram सारख्या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मला AI-आधारित पर्याय म्हणून विकसित केला जात होता. मात्र, IPO पूर्वी काही प्रकल्पांना कमी प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे यावर्षीच्या सुरुवातीला हा प्रकल्प बंद करण्यात आला.

शिकण्यासाठी सुरू केलेला वापर व्यसनात बदलला

ऑल्टमन यांनी सांगितलं की, TikTok समजून घेण्यासाठी त्यांनी प्रथमच हे ॲप वापरायला सुरुवात केली. यापूर्वी ते फक्त इतरांनी पाठवलेले काही व्हिडिओ पहायचे. मात्र,या प्लॅटफॉर्मचा अनुभव घेण्यासाठी नियमित वापर सुरू केल्यानंतर ते त्यात इतके गुंतले की ऑल्टमन यांना त्याचं व्यसनच लागलं. , लोकांचा जास्तीत जास्त वेळ अडकवणारे उत्पादन तयार करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे युजर्सचा अनुभव प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी त्यांनी TikTok वापरला.

10 मिनिटांपासून तासन्तास स्क्रोलिंग

सुरुवातीला झोपण्यापूर्वी केवळ दहा मिनिटे TikTok वापरण्याचा माझा विचार होता. पण अल्गोरिदमच्या प्रभावामुळे ही दहा मनिटं कधी संपली आणि त्याचं तासांमध्ये कधी रुपांतर झालं, ते मलाही कळलं नाही. काही वेळा तर संपूर्ण रात्र व्हिडिओ पाहण्यातच गेली, अशी कबुलीच त्यांनी दिली.

कधी झाली व्यसनाची जाणीव ?

ऑल्टमन यांनी सांगितलं की, एका शनिवारी दुपारी मी जवळपास तीन तास सतत TikTok पाहत बसलो होतो. त्याच वेळी मला जाणवलं की हे फक्त आता मनोरजंनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर आपल्याला याचं व्यसन लागलं आहे. “आधी मला वाटत होतं की माझं यावर पूर्ण नियंत्रण आहे. झोपण्यापूर्वी दहा मिनिटे वापरून आराम मिळतो, असे मी स्वतःला समजावत होतो. पण नंतर एक तास, दोन तास आणि दिवसेंदिवस ते तास वाढतच गेले. तेव्हा मला जाणवलं की स्मार्टफोनचा उद्देश हा नक्कीच नव्हता. त्या क्षणी ते आनंददायी वाटायचं, पण दीर्घकाळासाठी ते माझ्यासाठी हानिकारक असल्याची जाणीव झाली” असं ऑल्टमन यांनी नमूद केलं.

डिलीट केलं ॲप

ही जाणीव झाल्यावर ते ॲप वापरण्याचा कालावधी रात्री पाच ते दहा मिनिटं, इतका कमी करण्यात ऑल्टमन यांना काही प्रमाणात यश आलं. मात्र तरीही, अखेरीस त्यांनी TikTok अॅप पूर्णपणे डिलीट करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या फोनवरील जवळपास सर्व नोटिफिकेशन्सही बंद केली. मेसेजिंग ॲप्सच्या नोटिफिकेशन्सचाही त्यात समावेश असून, हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात सकारात्मक बदलांपैकी एक ठरल्याचे ऑल्टमन म्हणाले.

OpenAI च्या आगामी हार्डवेअरबाबत काय म्हणाले ?

पॉडकास्टमध्ये ऑल्टमन यांनी OpenAI च्या आगामी ChatGPT-आधारित हार्डवेअर उपकरणांबाबतही भाष्य केलं. त्यांच्या मते, ही उपकरणं लोकांसाठी अत्यंत उपयुक्त, सक्षम करणारी आणि दैनंदिन जीवन अधिक सोपे करणारी ठरतील. मात्र, कोणतेही शक्तिशाली तंत्रज्ञान जसे चांगल्या कामासाठी वापरले जाऊ शकतं, तसंच त्याचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे काही लोक या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून इतरांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकतात, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच