AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm द्वारे तुमच्या जवळची Blood Bank आणि प्लाझ्माची माहिती मिळवा, कंपनीकडून E-RaktKosh फीचर सुरु

भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमची (Paytm) मालकी असलेले वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (OCL) ईरक्तकोषचा (E-RaktKosh) समावेश करणारे पहिलेच अॅप बनले आहे. ईरक्तकोष हे नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेले केंद्रीयकृत रक्तपेढी व्यवस्थापन अॅप आहे.

Paytm द्वारे तुमच्या जवळची Blood Bank आणि प्लाझ्माची माहिती मिळवा, कंपनीकडून E-RaktKosh फीचर सुरु
Paytm
| Updated on: Apr 13, 2022 | 2:01 PM
Share

मुंबई : भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमची (Paytm) मालकी असलेले वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (OCL) ईरक्तकोषचा (E-RaktKosh) समावेश करणारे पहिलेच अॅप बनले आहे. ईरक्तकोष हे नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेले केंद्रीयकृत रक्तपेढी व्यवस्थापन अॅप आहे. सी-डीएसीने निर्माण केलेले ईरक्तकोष व्यासपीठ देशभरातील 2100 हून अधिक रक्तपेढ्यांचा कार्यप्रवाह कनेक्ट, डिजिटाईज व स्ट्रिमलाइन करणारा उपक्रम आहे. ईरक्तकोष फीचरसह पेटीएम युजर्स रक्तपेढ्यांच्या व्यापक श्रेणीबाबत माहिती मिळवण्यासोबत रिअल-टाइममध्ये माहिती शेअर करू शकतील. हे फीचर पेटीएम युजर्सना संपर्क माहिती पाहण्यासोबत त्यांच्याजवळ असलेल्या रक्तपेढीचा शोध घेण्यामध्ये देखील मदत करेल.

ईरक्तकोष अॅप नागरिकांना विविध रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या रक्त साठ्याबाबत माहिती मिळण्यामध्ये मदत करण्यासाठी भारत सरकारने विकसित केले. या समावेशनासह पेटीएमने त्यांच्या अॅपवर पेटीएम हेल्थ विभागामध्ये लाखो युजर्ससाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल आरोग्यसेवा सुविधांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीमध्ये वाढ केली आहे.

जवळची रक्तपेढी आणि प्लाझ्माची माहिती मिळवा

पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “आम्ही आमच्या सर्व युजर्ससाठी डिजिटल आरोग्यसेवा विनासायास उपलब्ध करून देण्याशी कटिबद्ध आहोत आणि त्याच दिशेने नवीन प्रयत्न म्हणून पेटीएम अॅपवर ईरक्तकोष वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. हे वैशिष्ट्य आपत्कालीन स्थितींमध्ये लोकांना देशभरातील हजारो रक्तपेढींमध्ये उपलब्ध असलेल्या प्लाझ्माबाबत जलदपणे माहिती मिळण्यासोबत रिअल-टाइममध्ये माहिती शेअर करण्याची सुविधा देत त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये धावपळ करण्याची गरज पूर्णत: कमी होईल.”

पेटीएमच्या आरोग्य सुविधा

ईरक्तकोष वैशिष्ट्याव्यतिरिक्त पेटीएम हेल्थ अनेक सार्वजनिक आरोग्य सुविधा, कोविड-संबंधित सेवांसह ऑनलाइन लस व बूस्टर डोस नोंदणी, लस प्रमाणपत्र, सवलतीच्या दरामध्ये ऑनलाइन औषधे ऑर्डर, डॉक्टरांचा सल्ला, स्पेशालिटी तपासण्या, लॅब टेस्ट बुकिंग्ज आणि आरोग्य विमा अशा सुविधा देखील देते.

इतर बातम्या

10 हजारांच्या रेंजमधला Vivo स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून किंमतीत कपात

युनिक लूकसह Realme 9 Pro + चं Free Fire लिमिटेड एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Apple WWDC 2022: जूनमध्ये येणार ‘ॲपल’चे ‘मॅक मिनी’ आणि ‘नवीन मॅकबुक प्रो’ डिझाईन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.