AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनची बॅटरी लवकर संपते? ‘हा’ मोड ऑन करा, आणि स्मार्टफोन 2 दिवस चालवा!

दररोज सकाळी फुल चार्ज केलेला फोन दुपारीच बॅटरी संपवतोय? महत्त्वाच्या कॉल किंवा मीटिंगवेळी 'Battery Low'चा मेसेज दिसला, की टेन्शन सुरू होतं? मग नवीन फोन घ्यायचा विचार डोक्यात येतो. पण थांबा! तुमच्या सध्याच्या फोनमध्येच एक अशी लपलेली 'बॅटरी बूस्टर' सेटिंग आहे, जी योग्यरीत्या वापरली तर बॅटरी तब्बल दोन दिवस टिकू शकते.

फोनची बॅटरी लवकर संपते? ‘हा’ मोड ऑन करा, आणि स्मार्टफोन 2 दिवस चालवा!
phone battery
| Edited By: | Updated on: May 11, 2025 | 3:41 PM
Share

डिजिटल युगात स्मार्टफोन हे केवळ बोलण्यासाठीच नव्हे, तर काम, बँकिंग, मनोरंजन, आणि सोशल मीडियासाठी अत्यावश्यक साधन बनले आहे. मात्र या स्मार्टफोनचा एक मोठा त्रास म्हणजे त्याची बॅटरी लवकर संपणे. सकाळी १००% चार्ज करून निघालेला फोन संध्याकाळपर्यंत दमतो, आणि चार्जिंग पॉइंटचा शोध सुरू होतो. अनेक वेळा प्रवासात किंवा महत्त्वाच्या कॉलवेळी बॅटरी संपल्याने मोठी अडचण होते.

अशा वेळी अनेकांना माहित नसलेली पण अत्यंत उपयुक्त अशी एक सुविधा आहे, Battery Saver Mode. काही मोबाईलमध्ये हा मोड Power Saving Mode या नावानेही दिसतो. हा मोड ऑन केल्यावर फोन स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करतो, बॅकग्राउंड अ‍ॅप्स थांबवतो, सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर मर्यादा घालतो, आणि प्रोसेसरचा वेग थोडा कमी करतो. यामुळे फोनची बॅटरी साठवून ठेवली जाते आणि त्याचा वापर अधिक काळ करता येतो. नेहमीच्या वापरात बॅटरी जिथे १ दिवस चालते, तिथे १.५ ते २ दिवस सहज टिकते.

कसा ऑन कराल हा मोड ?

हा मोड वापरणं अतिशय सोपं आहे. फक्त Settings > Battery किंवा Power विभागात जाऊन ‘Battery Saver’ किंवा ‘Power Saving Mode’ हा पर्याय शोधा आणि ऑन करा. काही स्मार्टफोनमध्ये हा मोड क्विक टॉगल पॅनलमध्ये सुद्धा असतो, ज्यामुळे एका टचमध्ये तो सुरू करता येतो. प्रवास करताना, बॅटरी कमी शिल्लक असताना किंवा दिवसभर चार्जिंगची सोय नसेल, तेव्हा हा मोड अत्यंत उपयोगी ठरतो.

फोन वापरताना बॅटरी लवकर उतरू नये म्हणून काही अतिरिक्त टिप्स

बॅटरी ०% होईपर्यंत वापरणं टाळा आणि १००% चार्ज करून वारंवार वापरणेही टाळा. २०% ते ८०% यामध्ये चार्जिंग राखणं बॅटरीच्या दीर्घायुष्यासाठी फायदेशीर असते. तसेच, चार्जिंग करताना फोनचं कव्हर काढल्यास गरमी कमी होते आणि चार्जिंग कार्यक्षमतेने होते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.