पंतप्रधान मोदींची ई-कॉमर्सबाबत मोठी घोषणा, 8 कोटींहून अधिक महिलांना सरकारी मदत मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, सरकारकडून बचत गटांनी (SHG) बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली जाईल.

पंतप्रधान मोदींची ई-कॉमर्सबाबत मोठी घोषणा, 8 कोटींहून अधिक महिलांना सरकारी मदत मिळणार
E-commerce
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 9:44 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, सरकारकडून बचत गटांनी (SHG) बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली जाईल. रविवारी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “खेडेगावांमधील 8 कोटीहून अधिक महिला या बचत गटांशी संबंधित आहेत, ज्या एकापेक्षा जास्त उत्पादने बनवतात, सरकारकडून त्यांना आधार दिला जाईल. यासाठी, आता सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल जेणेकरून ते त्यांच्या उत्पादनांसाठी देश-विदेशात मोठी बाजारपेठ उभारू शकतील. (PM announces establishment of e commerce platforms for made by self help groups products)

पंतप्रधान (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, ‘व्होकल फॉर लोकल’ या घोषवाक्याने देश पुढे जात आहे. ते म्हणाले की, “भारताने ‘लोकल फॉर व्होकल’ उपक्रम सुरू केला आहे आणि स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याची जबाबदारी आपली आहे. प्लास्टिकमुक्त भारताचे आपले स्वप्न तेव्हाच साकार होऊ शकते जेव्हा आपण सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, देश आजपासून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि येथून स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंतचा प्रवास हा ‘भारताच्या निर्मितीचा सुवर्णकाळ’ आहे. ते म्हणाले की, हे लक्ष्य “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” ने साध्य करावे लागेल.

बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सोनचिरैया’ ब्रँड सुरू

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने शहरी स्वयंसहाय्यता गटांच्या (एसएचजी) किंवा बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सोनचिरैया’ हा एकल ब्रँड सुरू केला आहे. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनानुसार, महिलांना “आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना सन्मानपूर्व जीवन जगण्यास मदत करणे” हे सरकारचे प्राधान्य आहे.

गावांची प्रगती होतेय

ग्रामीण भागातील विकासाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज आपण आपली गावे झपाट्याने बदलताना पाहतोय. गेल्या काही वर्षांत रस्ते, वीज यांसारख्या सुविधा गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. आज ऑप्टिकल फायबर नेटवर्क गावांना डेटा पॉवर पुरवत आहेत.

इतर बातम्या

Hiring Trends 2021 : डार्व्हिन बॉक्सचे सहसंस्थापक म्हणतात, सध्या सर्वांचं लक्ष केवळ प्रोफेशनल जॉब्सकडे

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

(PM announces establishment of e commerce platforms for made by self help groups products)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.