मोदी म्हणाले 1988 मध्ये कॅमेऱ्याने फोटो काढून ई – मेल केला, सोशल मीडियावर ट्रोल

मोदी म्हणाले 1988 मध्ये कॅमेऱ्याने फोटो काढून ई - मेल केला, सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : सर्वात पहिला ई मेल कधी करण्यात आला? सर्वात पहिला ई मेल कुणी आणि कुणाला केला असेल? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. हे प्रश्न अचानकपणे व्हायरल होण्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत. पंतप्रधान मोदी यांनी एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, आपण 1988 मध्ये डिजीटल कॅमेऱ्याने फोटो काढून आणि तो ई मेल केला होता, असं म्हटलं. मोदींच्या या विधानानंतर  सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण या दाव्याचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मोदींनी 1987-88 च्या दरम्यान ई मेल केल्याचं म्हटलं. पण ई मेलची सेवा 1995 पासून सर्वांसाठी सुरु झाल्याने, मोदींना ट्रोल करण्यात येत आहे.

सोशल मीडियाच नाही तर राजकीय पक्षांनीही हा मुद्या उचलून धरला आहे. काँग्रेसच्या आयटी सेल प्रमुख दिव्या स्पंदना यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. “1988 मध्ये नरेंद्र मोदी यांचा ई मेल आयडी काय असेल, तुम्हाला काय वाटतं? मला तर dud@lol.com असेल असं वाटतं”, असं ट्वीट दिव्या स्पंदना यांनी केलं.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

या मुलाखतीत मोदी म्हणाले,  1987-88 मध्ये मी पहिल्यांदा डिजीटल कॅमेऱ्याचा वापर केला. त्यावेळी अनेकांजवळ ई मेल होते. “माझ्या गावात विरमगाम येथे आडवाणी यांची सभा होती. मी माझ्या डिजीटल कॅमेऱ्याने त्यांचा फोटो घेतला आणि दिल्लीला पाठवला”, असा दावा मोदींनी केला होता. मोदींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर मोदींच्या ईमेलची चर्चा

सोशल मीडियावरही या मुद्यावरुन वाद सुरु आहे. अर्थतज्ज्ञ रुपा सुब्रमण्यम यांनी लिहिलं की, 1988 मध्ये पश्चिमी देशांमधील काहीच वैज्ञानिकांजवळ इंटरनेटची सुविधा होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी 1988 मध्ये भारतात ई मेल वापरला. पण इतर देशांमध्ये 1995 पासून इंटरनेट सेवांची सुरुवात झाली.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला. पंतप्रधानांजवळ पाकीट नव्हतं, कारण पैसे नसायचे. पण, 1988 मध्ये ई मेल आणि डिजीटल कॅमेरा होता, असा टोला ओवेसी यांनी मोदींनी लगावला.

Published On - 2:10 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI