6000mAh ची बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरासाह Poco M3 लाँचिंगसाठी सज्ज

POCO कंपनीने यावर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे.

6000mAh ची बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरासाह Poco M3 लाँचिंगसाठी सज्ज
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 5:47 PM

मुंबई : POCO कंपनीने यावर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच त्यांचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन POCO M3 लाँच करु शकते. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला आहे. ज्यामध्ये या स्मार्टफोनला रियल किलर म्हटलं आहे. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला आहे. असं म्हटलं जातंय की, भारतात या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हा स्मार्टफोन पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध करुन दिला जाईल. (POCO M3 smartphone is ready to launch with 6000mAh battery and triple rear camera)

Poco M3 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह येईल. फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह Adreno 610 GPU चा सपोर्ट मिळेल. पोको एम 3 स्मार्टफोन गूगलच्या अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित असेल. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन केलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह येईल.

फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) असेल. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट असेल. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा दिला जाईल. कंपनी हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट्समध्ये सादर करु शकते. 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 149 डॉलर्स (जवळपास 11 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 169 डॉलर्स म्हणजेच 12 हजार 500 रुपये ठेवण्यात आली आहे.

आतापर्यंत अनेकदा कंपनीच्या M आणि C सीरिजमधील फोन रेडमीच्या डिव्हाईससोबत रिब्रॅण्ड करण्यात आले आहेत. Poco M3 रिब्रॅण्ड केला जाणार आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हा फोन रेडमीच्या नोट 9 सीरीजपासून प्रेरणा घेत बनवलेला आहे.

हेही वाचा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

(POCO M3 smartphone is ready to launch with 6000mAh battery and triple rear camera)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.