चार्जिंगची चिंता मिटणार, बाजारात येणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; एकदा चार्ज केला की…
Realme 16 Pro: Realme आपला नवीन स्मार्टफोन, Realme 16 Pro, 6 जानेवारी 2026 रोजी भारतात लाँच करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Realme आपला नवीन स्मार्टफोन, Realme 16 Pro, 6 जानेवारी 2026 रोजी भारतात लाँच करणार आहे. कंपनीचा हा फोन Pro+ व्हेरिएंटपेक्षा एक स्टेप खाली आहे. मात्र यातील फीचर्स फ्लॅगशिप फोनसारखे आहेत. या फोनमध्ये महागड्या मॉडेलसारखीच 200MP कॅमेरा सिस्टम असणार आहे. तसेच या फोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी, हाय-रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि नवीन डायमेन्सिटी चिपसेट देखील मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
200MP कॅमेरा
Realme 16 Pro मध्ये Samsung HP5 सेन्सरवर आधारित 200MP LumaColor कॅमेरा देण्यात आलेला आहे. हा कॅमेरा सुपर OIS आणि फुल-पिक्सेल ऑटो झूमला सपोर्ट करतो. हा कॅमेरा 1x, 2x आणि 4x लॉसलेस झूमला सपोर्ट करतो. या कॅमेऱ्याला TÜV Rheinland कडून कलर अॅक्युरिटी सर्टिफिकेशन मिलालेले आहे. यात हायपर RAW अल्गोरिथम आहे. यामुळे हा फोन कमी प्रकाशात चांगले फोटो काढू शकतो.
पोर्ट्रेट मोड आणि एआय-बेस्ड टूल्स
Realme 16 Pro या फोनमध्ये प्रो+ मॉडेलप्रमाणेच फाईव्ह-फोकल-लेंथ पोर्ट्रेट सिस्टम असणार आहे. यात 1x ते 4x पर्यंत वेगवेगळे पोर्ट्रेट पर्याय मिळतात. यामुळे फुल-बॉडी आणि क्लोज-अप शॉट्स कॅप्चर करणे फायदेशीर ठरतात. कंपनीने यात एक व्हायब मास्टर मोड देखील दिला आहे. जो 21 प्रीसेट पोर्ट्रेट टोन ऑफर करतो. याव्यतिरिक्त या फोनमध्ये एआय एडिट जिनीच्या मदतीने फोटो देखील एडिट करता येतात.
व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कंटेंट क्रिएशन
रिअलमी 16 प्रो हा फोन व्हिडिओ रेकॉर्डिंगची आवड असणाऱ्यांसाठी खास आहे. या फोनमधील कॅमेरा 1x आणि 2x झूमवर 4K HDR व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. यात ट्रॅकिंग मेनट्रॅक अल्गोरिथम मिळते, ज्यामुळे व्हिडिओला अधिक स्टेबॅलिटी मिळते. एआय इन्स्टंट क्लिप फीचरमध्ये प्रवास, पार्ट्या आणि कार्यक्रमांसाठी तयार केलेले व्हिडिओ टेम्पलेट्स देखील मिळतात.
बॅटरी, डिस्प्ले आणि परफॉर्मन्स
फोनमध्ये 7000mAh टायटन बॅटरी मिळते, ज्यामुळे फोन एकदा चार्ज केला की इतर फोनच्या तुलनेत जास्त वेळ वापरता येतो. यात सुपर पॉवर सेव्हिंग मोड आणि बायपास चार्जिंग फीचर्स मिळते, यामुळे उष्णता नियंत्रित होण्यास मदत होते. या फोनमध्ये 1.5K AMOLED पॅनल असलेला डिस्प्ले मिळतो. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 6500 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तसेच यात MediaTek Dimensity 7300-Max चिपसेट मिळतो.
