200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 8 एलिट जेन 5 चिपसह सुसज्ज असा Realme चा अद्भुत फोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत
रियलमी कंपनीने त्यांचा नवीन Realme GT 8 Pro हा स्मार्टफोन लाँच केलेला आहे. यामध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा त्यासोबतच अनेक जबरदस्त फिचर्स देण्यात आलेले आहे. तर आजच्या लेखात आपण हा स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात. न

चीनी स्मार्टफोन ब्रँड असलेल्या Realme ने त्यांचा सर्वात पॉवरफुल फोन Realme GT 8 Pro लाँच केला आहे. हा फोन 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेटसह सुसज्ज केला आहे. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंचाचा BOE Q10 फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे. यात 512GB पर्यंत UFS 4.1 इंटरनल स्टोरेज आणि 32MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊयात.
Realme GT 8 Pro: स्मार्टफोनची किंमत किती आहे?
Realme GT 8 Pro भारतात 72,999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे, ज्याचा बेस व्हेरिएंट 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे. तर 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 78,999 रूपये आहे. Realme GT 8 Pro Dream Edition ची किंमत भारतात 79,999 रूपये इतकी आहे. हा फोन पांढऱ्या आणि अर्बन ब्लू रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. तसेच हा फोन तुम्हाला फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडिया ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येऊ शकतो.
Realme GT 8 Pro: स्पेसिफिकेशन्स
Realme GT 8 Pro मध्ये 6.79-इंचाचा QHD+ BOE Q10 फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे, कमाल टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे, HDR सपोर्ट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट आणि हाय ब्राइटनेस मोड (HBM) मध्ये 2,000 निट्सची पीक ब्राइटनेस आहे.
स्क्रीनमध्ये 508 ppi पिक्सेल डेन्सिटी, 1.07 अब्ज कलर्स, 19.6:9 आस्पेक्ट रेशो आणि गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील आहे.
फोनमध्ये 3nm ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट आहे, जो 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो.
गेमिंगसाठी, त्यात 7,000 sq mm व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम आणि Adreno 840 GPU देखील आहे.
कॅमेरा सेटअप
Realme GT 8 Pro च्या कॅमेरा सेटअपमध्ये मागील बाजूस 200-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे, जो 3x ऑप्टिकल झूम आणि 12x पर्यंत लॉसलेस झूम, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सर आणि 50-मेगापिक्सेल (f/1.8) Sony IMX906 प्रायमरी कॅमेरा देतो. फोनमध्ये 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील आहे. यात 7000mAh बॅटरी आहे आणि 120W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
