स्मार्टफोन, स्मार्टवॉचनंतर Realme आता लॅपटॉप लाँच करणार, कमी किमतीत शानदार फीचर्स

रियलमी कंपनी लवकरच भारतात त्यांचा पहिला लॅपटॉप लाँच करु शकते. कंपनीने त्यासाठी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

स्मार्टफोन, स्मार्टवॉचनंतर Realme आता लॅपटॉप लाँच करणार, कमी किमतीत शानदार फीचर्स
Realme Laptops
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 9:15 AM

मुंबई : एप्रिल फूलच्या दिवशी (1 एप्रिल) विनोद केल्यानंतर, लॅपटॉपबद्दल रियलमी (Realme) लवकरच गंभीर होऊ शकते. स्मार्टफोन कंपनीने युजर्सना आपल्या फॉर्मवर लॅपटॉपविषयी अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. रियलमीने ग्राहकांना विचारले आहे की, येत्या तीन महिन्यांत नवीन लॅपटॉप घेण्याची त्यांची योजना आहे का? त्यामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे की, 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत कंपनी त्यांचा पहिला लॅपटॉप लॉन्च करू शकते. कंपनीमधील काही सूत्रांनीदेखील त्यास दुजोरा दिला आहे. (Realme laptop going to launch in India, survey on forum website suggests)

रियलमी सर्व वापरकर्त्यांना फॉर्मवर वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. त्यात त्यांनी वैयक्तिक माहिती, वय, लिंग, वार्षिक उत्पन्न आणि इतर काही प्रश्न विचारले आहेत. यानंतर, रियलमी कंपनीने रियलमीचा फोन वापरणार्‍या वापरकर्त्यांना ते त्यांच्याकडे असलेल्या फोनमुळे ते किती आनंदित आहेत, असा प्रश्नदेखील विचारला आहे. कंपनी नेहमीच आपल्या युजर्सचे अशा प्रकारचे सर्वेक्षण करत असते, त्यानुसारच कंपनीच्या अनेक योजना ठरतात. यावेळी कंपनीने युजर्सना लॅपटॉपबद्दल प्रश्न विचारले आहेत.

किंमत 30,000 ते 50,000 रुपये

रियलमीने युजर्सना लॅपटॉपबद्दल विचारले आहे की, जर कंपनीने लॅपटॉप लॉन्च केला तर ते किती किंमतीत तो लॅपटॉप घेण्यास तयार आहेत. रियलमीने सांगितले की, लॅपटॉपची किंमत 30,000 रुपये ते 50,000 रुपयांपर्यंत असू शकते. म्हणजेच एंट्री-लेव्हल लॅपटॉप बाजारात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

MI Notebook 14 ला टक्कर

रियलमीने जर भारतात लॅपटॉप लॉन्च केला तर तो शाओमी मी नोटबुक 14 (Xiaomi MI Notebook 14) ला जोरदार स्पर्धा देईल, ज्याची किंमत 41,999 रुपये आहे. कंपनीने सर्वेक्षण करताना युजर्सना विचारलं आहे की, ते सध्या लॅपटॉप वापरत आहेत का, जर त्यांच उत्तर ‘हो’ असं असेल तर कोणता लॅपटॉप वापरत आहेत, असा प्रश्नदेखील विचारला आहे. यासोबत कंपनीला हेदेखील जाणून घ्यायचे आहे की, जर आगामी काळात त्यांनी लॅपटॉप लाँच केला तर त्यांना कोणत्या ब्रँड्सशी किंवा मॉडेलशी स्पर्धा करावी लागणार आहे.

प्रँक नव्हे यावेळी कंपनी गंभीर

यापूर्वी कंपनीने एप्रिल महिन्यात लॅटॉपच्या लाँचिंगबाबत युजर्ससोबत एक प्रँक केला होता. तथापि, नंतर कंपनीनेच सांगितले होते की, हा एप्रिल फूलचा विनोद आहे. परंतु आता लॅपटॉप लाँच करणे हा विनोद नसून कंपनी याबाबत गंभीर असल्याचे वृत्त आहे. रियलमी कंपनी लवकरच बाजारात आपला पहिला लॅपटॉप लाँच करणार आहे.

संबंधित बातम्या

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

MediaTek Dimensity प्रोसेसरसह Realme X7 5G सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Realme laptop going to launch in India, survey on forum website suggests)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.