
Realme कंपनीने यावर्षी मे महिन्यात 10000 mAh बॅटरी असलेला एक कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केला होता, आता कंपनी आणखी मोठ्या बॅटरीसह एक नवीन फोन लाँच करण्याची घोषणा करत आहे. हँडसेटचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु कंपनीने लाँच करण्यात येणारा त्यांचा हा फोन चांगल्या वायर्ड चार्जिंग स्पीडला सपोर्ट करेल. तसेच कंपनीने Realme GT 7 ही सिरिज या वर्षी एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आली होती आणि या हँडसेटला 7200mAh मोठीबॅटरी देण्यात आली होती. भारतात हाच हँडसेट 7000mAh बॅटरी मध्ये उपलब्ध आहे.
X हँडलवरून एका पोस्टमध्ये, 27 ऑगस्ट रोजी Realme ने ‘1x०००mAh’ बॅटरी असलेल्या नवीन फोन लाँच करण्याची घोषणा केली. आता यामध्ये ‘x’ म्हणजे बॅटरी किमान 10,000mAh किंवा त्या पेक्षा जास्त पॉवर असलेल्या बॅटरीचा फोन असण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या आणखी एका पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा फोन आणखी मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो. त्यात म्हटले आहे की ‘320 वॅट फास्ट चार्जिंगपासून ते 10,000 एमएएच बॅटरीपर्यंत… याचा अर्थ असा की येणारा रिअलमी हँडसेट पुढील जनरेशनसाठी मोठी बॅटरी आणि चार्जिंग तंत्रज्ञानासह येऊ शकतो.
तर रिअलमीच्या या हँडसेटचे नाव अद्याप उघड झालेले नाही. रिअलमी त्याच्या लाँचिंगपूर्वी येत्या काही दिवसांत अधिक माहिती सांगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
NOT BIG ENOUGH? NOW, IT IS.
realme 1x000mAh — redefines limits again.
August 27. Witness the extreme. pic.twitter.com/S6BYJyj8wY— realme Global (@realmeglobal) August 21, 2025
मे महिन्यात, कंपनीने Realme GT कॉन्सेप्ट फोन प्रदर्शित केला ज्यामध्ये 10,000mAh बॅटरी आणि 320W फास्ट चार्जिंग सपोर्ट होता. हा फोन 8.5 मिमी पेक्षा कमी जाड होता, तसेच या फोनचे वजन 200 ग्रॅमपेक्षा थोडे जास्त होते आणि त्याचा बॅक सेमी ट्रांस्परेंट होता. त्याची ‘मिनी डायमंड’ आर्किटेक्चर मोठ्या बॅटरीमध्ये बसण्यासाठी अंतर्गत लेआउटची री-अरेंज करते.
दुसरीकडे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिअलमीने सादर केलेल्या 320 वॅटची सुपरसॉनिक चार्जिंग तंत्रज्ञान स्मार्टफोन फक्त चार मिनिटे आणि 30 सेकंदात 0 ते 100 टक्के चार्ज करण्याचा दावा कंपनीने केला आहे. फक्त एका मिनिटाच्या चार्जिंगमध्ये बॅटरी 26 टक्के चार्ज होऊ शकते, तर 50 टक्के चार्जिंगसाठी फक्त दोन मिनिटे लागतात असे म्हटले जाते.
सध्या Realme स्मार्टफोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी Realme GT 7 च्या चिनी व्हेरिएंटमध्ये आहे, ज्यामध्ये 7,200mAh सेल आहे. तसेच हा फोन 100W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर त्याचा भारतीय व्हेरिएंट 7,000mAh बॅटरी आणि 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.