AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme चा सर्वात स्लीम स्मार्टफोन आला, 7000mAh बॅटरी क्षमता, किंमत किती ?

रिअलमी कंपनीने 7000 एमएएच बॅटरी क्षमतेचा Realme 15T स्मार्टफोन लाँच केलेला आहे. दमदार बॅटरीअसूनही हा कंपनीचा सर्वात स्लीम स्मार्टफोन आहे. या फोनची प्री बुकींग सुरु झाली आहे आणि बाजारातील विक्री ही लवकरच सुरु होत आहे. या फोनची किंमत काय पाहूयात...

Realme चा सर्वात स्लीम स्मार्टफोन आला, 7000mAh बॅटरी क्षमता, किंमत किती ?
Realme 15T
| Updated on: Sep 02, 2025 | 3:27 PM
Share

Realme 15 Series मध्ये आता Realme 15T स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. 7000 एमएएच बॅटरीसह लाँच झालेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तसेच 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमरा सारखी वैशिष्ट्ये दिलेली आहेत. या फोनमध्ये एअरफ्लो वॅपर चेंबर कुलिंग सिस्टीम दिलेली आहे. जी या हँडसेटमध्ये निर्माण होणारी उष्णता थंड करण्याचे काम करते.

या रिअलमी स्मार्टफोनच्या 8 जीबी/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये,8 जीबी/256 जीबी व्हेरिएंट किंमत 22,999 रुपये आणि 12 जीबी/256 जीबीवाल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. या फोनची प्री बुकींग सुरु झालेली आहे.आणि 5 सप्टेंबरपासून या फोनची विक्री Flipkart, रिअलमीच्या अधिकृत वेबसाईट आणि निवडक ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर सुरु होणार आहे.

ग्राहकांना निवडक बँक कार्ड्सवर EMI ट्रांझक्शनद्वारे पेमेंटवर 2000 रुपये ( ऑनलाईन खरेदीवर ) सूट आणि फुल स्वाईप ट्राक्झंशनवर 1000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काऊंटचा फायदा मिळणार आहे. या शिवाय डाऊन पेमेंट केल्यानंतर 10 महिन्यांचे नो- कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील मिळणार आहे.

याशिवाय जे ग्राहक फोनची प्री बुकींग करतील त्यांना कंपनीच्या वतीने Realme Buds T01 TWS ईअरबड्स फ्री दिले जाणार आहे. फोनला ऑफलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्ड्सवर 2 हजार रुपयांचे इंस्टेन्ट डिस्काऊंट आणि 5000 रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज ऑफर आणि नऊ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा फायदा मिळणार आहे. या रिअलमी स्मार्टफोनची टक्कर मोटोरोला एज 60 फ्यूजन,विवो टी-4 5 जी, रिअलमी जीटी निओ 3,नथिंग फोन 3 ए सारखे स्मार्टफोनबरोबर होणार आहे.

Realme 15T Specifications

स्क्रीन: या रिअलमी स्मार्टफोनमध्ये 6.57 इंच फुल-एचडी प्लस रिझॉल्यूशनवाला 4R कम्फर्ट प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.जे 4000 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस सपोर्ट सोबत येतो.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी रिअलमी 15 टी मध्ये 6nm ऑक्टा-कोअर मीडियाटेक डायमेन्शन 6400 प्रोसेसरचा वापर झालेला आहे.

ऑपरेटिंग सिस्टीम: एंड्रॉयड 15वर आधारित ही लेटेस्ट फोन रिअलमी यूआय 6 वर काम करत आहे.

कॅमरा: फोनच्या मागे 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमरा सेंसर दिलेला आहे. तसेच सोबतच 2 मेगापिक्सेल सेकेंडरी कॅमरा सेंसर दिलेला आहे. फोनच्या फ्रंटला 50 मेगापिक्सेल कॅमरा सेंसर देखील मिळणार आहे.

फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडियो रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. याशिवाय फोनमध्ये एआय फिचर्स दिलेले आहेत. उदा. एआय एडिट जिनी, एआय स्नॅप मोड आणि एआय लँडस्केपसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

बॅटरी: 7000mAh ची तगडी बॅटरी फोनमध्ये आहे. 60 वॅट सुपरवूक चार्जिंग आणि 10 वॅट रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते.

कनेक्टीव्हीटी: या फोनमध्ये सिक्युरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिलेला आहे. या शिवाय फोनमध्ये 4G, 5G, ब्लूटूथ 5.3, वाय-फाय,यूएसबी टाईप-सी, जीपीएस पोर्ट सामिल आहेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.