AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jiohostar : क्रिकेटप्रेमींना 90 दिवसांसाठी खास Plan, किंमत किती?

रिलायन्स जिओने क्रिकेटप्रेमींसाठी इतक्या रुपयांचा डेटा पॅक आणला आहे. या प्लॅनमध्ये डेटा आणि जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. चला तर मग या प्लॅनमध्ये तुम्हाला किती जीबी डेटा मिळेल आणि याची वैधता किती दिवसांची आहे ते जाणून घेऊयात.

Jiohostar : क्रिकेटप्रेमींना 90 दिवसांसाठी खास Plan, किंमत किती?
Jiohotsar PlanImage Credit source: Freepik/File Photo
| Edited By: Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 7:28 AM
Share

रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी एक धमाकेदार प्लॅन लाँच केला आहे. तर कंपनीने फक्त 149 रुपयांचा एक परवडणारा प्रीपेड प्लॅन आणला आहे, जो क्रिकेट सीजनमध्ये सामने स्ट्रीम करण्यासाठी काही अतिरिक्त फायदे देतो. कारण आजकाल अनेक लोकं ही ऑनलाइन मार्फत थेट खेळ पाहत असतात, पण प्रत्येकाला महागडे डेटा रिचार्ज करून सामने पाहायला शक्य होत नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण रिलायन्स जिओच्या या स्वस्त डेटा पॅकबद्दल अधिक जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओचा हा पॅक स्वस्त आणि अप्रतिम आहे. हा 149 रुपयांचा प्लॅन एक डेटा पॅक आहे, त्यामुळे तुमच्या नंबरवर आधीपासूनच एक सक्रिय प्लॅन असणे आवश्यक आहे. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ‘क्रिकेट डेटा पॅक’ म्हणून सूचीबद्ध करण्यात आला आहे. तुम्ही हा प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवरून आणि मायजिओ ॲपवरून खरेदी करू शकता.

कंपनी तुम्हाला 149 रूपयांमध्ये 10 जीबी हाय-स्पीड डेटा देणार आहे. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे, परंतु तुम्ही या प्लॅनच्या अतिरिक्त लाभांचा फायदा 90 दिवसांपर्यंत घेऊ शकता. डेटा व्यतिरिक्त कंपनी जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देखील देत आहे, जे 90 दिवसांसाठी वैध असेल. तर हा एक डेटा पॅक आहे, त्यामुळे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला या पॅकमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे मिळणार नाहीत. डेटा संपल्यानंतर स्पीड लिमिट 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.

जिओ हॉटस्टार मोबाईलवर तुम्ही थेट क्रिकेट सामने, चित्रपट, खेळ, वेब सिरीज आणि रिजनल मनोरंजन कार्यक्रमांचाही आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला 10 जीबी डेटा अपुरा वाटत असेल, तर तुम्ही कंपनीचा 195 रुपयांचा पॅक खरेदी करू शकता, ज्यामध्ये 10 जीबी ऐवजी 15 जीबी डेटा मिळतो.

एअरटेल 195 प्लॅन

एअरटेलच्या 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. 30 दिवसांची वैधता असलेला हा प्लॅन एक डेटा पॅक असून, यामध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेसह 20 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन महिन्यांसाठी प्रवेश मिळतो.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल