AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लावाच्या 5000mAh बॅटरी आणि 8GB पर्यंत रॅम असलेल्या ‘या’ स्वस्त फोनची विक्री सुरू

Lava Bold N2 Pro ची विक्री 6 एप्रिल रोजी फ्लिपकार्टवर सुरू झाली. 8000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. चला या फोनमध्ये कोणते फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात.

लावाच्या 5000mAh बॅटरी आणि 8GB पर्यंत रॅम असलेल्या 'या' स्वस्त फोनची विक्री सुरू
lava
| Edited By: | Updated on: Apr 08, 2026 | 8:04 AM
Share

देशांतर्गत असलेल्या स्मार्टफोन ब्रँड लावा ने नुकताच बोल्ड एन2 प्रो लाँच केला असून या फोनची विक्री ६ एप्रिलपासून सुरू झाली आहे. 10 हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीचा हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 50 मेगापिक्सेलचा एआय रिअर कॅमेरा, 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि 5000 mAh क्षमतेची बॅटरी यांचा समावेश आहे, जे परफॉर्मन्स, मनोरंजन आणि दैनंदिन वापरामध्ये एक संतुलित अनुभव देतात. चला तर या फोनमध्ये कोणते फिचर्स आहेत ते त्यांची किंमत जाणून घेऊयात.

UNISOC T7250 ऑक्टा-कोअर प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये 4GB रॅम आणि 4GB व्हर्च्युअल रॅम आहे. याव्यतिरिक्त, फोटो, व्हिडिओ आणि बरेच काही साठवण्यासाठी 128GB स्टोरेज आहे. IP54-रेटेड टिकाऊपणा, टाइप-सी फास्ट चार्जिंग आणि लावाची मोफत होम सर्व्हिस यांसारख्या वैशिष्ट्यांचाही यात समावेश आहे. हा फोन एक्लिप्स ग्रे आणि अरोरा गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

भारतात Lava Bold N2 Pro ची किंमत

या हँडसेटची किंमत 7 हजार 999 रूपये आहे. हा फोन आता फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हा बजेट फोन या किंमतीच्या रेंजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी M07, रेडमी A5 आणि Ai प्लस पल्स 2 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

लावा बोल्ड एन२ प्रो फिचर्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असलेला 6.75-इंचाचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: हा बजेट फोन अँड्रॉइड 15 वर चालतो आणि कंपनीचा दावा आहे की या डिव्हाइसला अँड्रॉइड 16 चे अपडेट आणि 2 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी लावा कंपनीच्या या बजेट फोनमध्ये युनिसॉक टी7250 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पुढील बाजूस 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

आयपी रेटिंग: या फोनला धूळ आणि पाण्याच्या शिडकाव्यापासून संरक्षणासाठी आयपी54 रेटिंग मिळाले आहे.

कनेक्टिव्हिटी: हा हँडसेट ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि ४जी एलटीई कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

बॅटरी: यामध्ये 18W पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्टसह पॉवरफूल 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक