AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samsung Galaxy A53 5Gच्या किमतीत 3000 रुपयांची कपात; स्वस्तात मिळणार प्रीमिअम फीचर्स

Samsung Galaxy A53 5G : प्रीमिअम फीचर्ससह आलेल्या सॅमसंग 5जी स्मार्टफोनच्या किमतीत 3000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. वाचा...

Samsung Galaxy A53 5Gच्या किमतीत 3000 रुपयांची कपात; स्वस्तात मिळणार प्रीमिअम फीचर्स
Samsung Galaxy A53 5GImage Credit source: social
| Updated on: Aug 22, 2022 | 12:24 PM
Share

मुंबई : Samsung Galaxy A53 5G Price in India: स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung)मिड-रेंज स्मार्टफोन गॅलॅक्सी ए 53 जी (Galaxy A53 5G) च्या किमतीमध्ये 3 हजार रुपयांची (price cut by 3000 rupees) कपात केली आहे. हा स्मार्टफोन मार्च महिन्यात बाजारात लाँच करण्यात आला होता. या फोनची दोन व्हेरिएंट्स बाजारात असून कंपनीने दोन्ही मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. तुम्हालाही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर ही चांगली संधी आहे. सॅमसंग गॅलॅक्सी ए 53 जी मोबाईल फोनची नवी किंमत आणि या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल (Features and price) सविस्तर माहिती जाणून घेऊया. सॅमसंगचा हा फोन जेव्हा बाजारात लाँच झाला तेव्हा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये होती तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 35,999 रुपये इतकी होती.

मात्र आता या फोनच्या किमतीत 3 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता 6 जीबी मॉडेलसाठी 31,499 रुपये तर 8 जीबी मॉडेलसाठी 32,999 रुपये मोजावे लागतील.

हायलाईट्स

  1. सॅमसंगचा लाँच झाला तेव्हा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये होती
  2. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 35,999 रुपये इतकी होती.
  3. 6 जीबी मॉडेलसाठी 31,499 रुपये तर 8 जीबी मॉडेलसाठी 32,999 रुपये मोजावे लागतील.
  4. हँडसेट 120 हर्ट्स रिफ्रेश रेट सह येतो.
  5. सॅमसंग गॅलॅक्सी ए 53 5 जी स्मार्टफोनमधील मागील बाजूस 4 रिअर कॅमेरे देण्यात आले
  6. 5 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर देण्यात आले आहे.

या नव्या किमतीसह हा फोन सॅमसंगच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A53 5G स्पेसिफिकेशन्स –

  • प्रोसेसर – स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी गॅलॅक्सी ए 53 5 जी स्मार्टफोनमध्ये ॲक्सीनॉक्स 1280 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे.
  • डिस्प्ले – या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा फुल-एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले (1080×2400 पिक्सेल) आहे. आणि हा हँडसेट 120 हर्ट्स रिफ्रेश रेट सह येतो.
  • बॅटरी – या फोनमध्ये 5000 एमएएमच बॅटरी देण्यात आहे, जी 25 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट करते. या फोनची बॅटरी 30 मिनिटांत 50 टक्क्यापर्यंत चार्ज होते.

कॅमेरा -सॅमसंग गॅलॅक्सी ए 53 5 जी स्मार्टफोनमधील मागील बाजूस 4 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये 64 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड ॲंगल सेन्सर, 5 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधेसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.