Samsung Galaxy F15 | सॅमसंगचा भारतीय बाजारात धमाका! नवीन स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी

Samsung Galaxy F15 | सॅमसंगचा नवीन दमदार 5 जी स्मार्टफोन भारतात लवकरच दाखल होत आहे. या नवीन हँडसेटमध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर अनेक दमदार फीचर्स आहेत. नवीन स्मार्टफोनविषयी ग्राहकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

Samsung Galaxy F15 | सॅमसंगचा भारतीय बाजारात धमाका! नवीन स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 2:05 PM

नवी दिल्ली | 22 February 2024 : सॅमसंग भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि अनेक दमदार फीचर्स आहेत. हा स्मार्टफोन sAMOLED डिस्प्लेसह बाजारात दाखल होत आहे. सॅमसंगच्या प्रोफाईलमध्ये अनेक जोरदार स्मार्टफोनची पूर्ण मालिका आहे. त्यात Samsung Galaxy F15 या नवीन स्मार्टफोनचे नाव जोडल्या गेले आहे. हा स्मार्टफोन बाजारात केव्हा दाखल होणार याची माहिती कंपनीने दिली आहे. एक्सवर याविषयी कंपनीने पोस्ट टाकली आहे.

ट्रिपल रिअर कॅमऱ्याची रंगत

अधिकृत टीझरनुसार, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. LED Flash लाईटसह येईल. हा हँडसेट Flipkart वर उपलब्ध होईल. या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 6100+ SoC चा वापर करण्यात येईल. या फोनमध्ये इतर पण अनेक फीचर्सची रेलचेल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे चीनी कंपन्यांच्या फीचर्स पण स्वस्त फोनला हा स्मार्टफोन टक्कर देईल. त्यांच्या बाजारात घुसखोरी करणार असल्याचे दिसते.

हे सुद्धा वाचा

नवीन स्मार्टफोनची किंमत किती

Samsung Galaxy F15 विषयी कंपनीने यापूर्वीच टीझर आणले आहे. त्यात हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीला असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा Super AMOLED डिस्प्ले स्मार्टफोन असेल. या हँडसेटमध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी मिळेल. या स्मार्टफोनला फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. कंपनी फास्ट चार्जर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन हा कम्प्लीट पॅकेज असेल.

4GB RAM-Android 14 वर करेल काम

GeekBench वर हा स्मार्टफोन दिसला होता. या ठिकाणाहून काही वैशिष्ट्ये समोर आली होती. हा डिव्हाईस 4GB RAM आणि OS आधारीत One UI वर काम करणार आहे. येत्या काही दिवसात कंपनीकडून या स्मार्टफोनविषयीची सविस्तर माहिती समोर येईल. हा स्मार्टफोन येत्या 4 मार्चला बाजारात दाखल होत आहे. या स्मार्टफोनची किंमत पंधरा हजारांपेक्षा कमी असेल. या सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन धमाका करणार आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.