64MP कॅमेरासह Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन महिना अखेरीस लाँच होणार, जाणून घ्या काय असेल खास?

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G स्मार्टफोन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो आणि त्याची विक्री ऑक्टोबरमध्ये सुरू होईल.

64MP कॅमेरासह Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन महिना अखेरीस लाँच होणार, जाणून घ्या काय असेल खास?
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:29 PM

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी F42 5G स्मार्टफोन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो आणि त्याची विक्री ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. उद्योग सूत्रांनी मंगळवारी आयएएनएसला याबाबत माहिती दिली. गॅलेक्सी एफ मालिकेतील हा सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन असेल आणि दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनीने या सिरीजसाठी फ्लिपकार्टशी भागीदारी केली आहे. (Samsung Galaxy F42 5G smartphone with 64MP camera will be launched at the end of september, know details)

Galaxy F42 5G Galaxy 5G 12 बँड सपोर्टसह येईल, जो फास्ट स्पीड आणि लो लेटेन्सी सुनिश्चित करून ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. Galaxy F42 5G डिटेल्ड शॉट्स घेण्यासाठी 6 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरासह येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गॅलेक्सी F42 5G फुल एचडी+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येईल.

सॅमसंगने यावर्षी गॅलेक्सी एफ पोर्टफोलिओमध्ये स्मार्टफोनची एक सिरीज लाँच केली आहे. गॅलेक्सी F42 5G भारतात लॉन्च होणारा F सीरिजचा पहिला 5G स्मार्टफोन असेल.

शिवाय, amazon.in वर लाइव्ह झालेल्या प्री-लॉन्च वेबसाइटनुसार, सॅमसंग 28 सप्टेंबर रोजी आपला पुढील 5G ​​स्मार्टफोन गॅलेक्सी M52 5G भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च झाल्यानंतर Galaxy M52 5G Samsung.com, amazon.in आणि निवडक किरकोळ दुकानांवर उपलब्ध होईल. अमेझॉनवर सॅमसंगने सादर केलेल्या टीझरमध्ये, गॅलेक्सी एम 52 5 जीला सर्वात स्लिम, मीनेस्ट मॉन्स्टर म्हणून संबोधले जात आहे. गॅलेक्सी M52 5G M51 पेक्षा 21 टक्के अधिक आकर्षक आहे.

सॅमसंगची एम मालिका मोठ्या बॅटरी पॅक आणि फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 778 जी प्रोसेसरसह येण्याची अपेक्षा आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ती 7.4 मिमी स्लीक डिझाइनसह येईल. गॅलेक्सी M52 5G 6.7 फुल एचडी+ स्मोल्ड डिस्प्लेसह येऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल अशी अपेक्षा आहे.

याचे डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 च्या संरक्षणासह येऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज स्पेस असेल. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप 64 MP + 12 MP + 5 MP कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. हा फोन Android 11 वर चालेल आणि 15W फास्ट चार्जरसह येण्याची अपेक्षा आहे.

गॅलेक्सी M52 5G लाँच केल्यावर, सॅमसंग देशातील 5G ​​पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल. गॅलेक्सी M52 5G हा सॅमसंगचा अलीकडेच लॉन्च झालेल्या गॅलेक्सी M32 5G आणि Galaxy M42 5G नंतर सॅमसंगचा तिसरा 5G स्मार्टफोन असेल.

इतर बातम्या

Apple iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max च्या भारतीय खरेदीदारांना धक्का, शिपिंग उशिरा होणार

स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स

र्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस

(Samsung Galaxy F42 5G smartphone with 64MP camera will be launched at the end of september, know details)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.