Samsung Galaxy M05 बाजारात, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची दमदार बॅटरी, किंमत तर 8 हजारांपेक्षा कमी

Samsung Galaxy M05 Price in India : सॅमसंगने M-सीरीजचा नवीन डिव्हाईस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. Samsung Galaxy M05 चा हा स्वस्त मोबाईल आहे. यामध्ये तुम्हाला 50MP चा मेन लेन्सचा ड्युअल रिअर कॅमेरा मिळतो.

Samsung Galaxy M05 बाजारात, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची दमदार बॅटरी, किंमत तर 8 हजारांपेक्षा कमी
सॅमसंगचा नवीन दमदार स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 4:15 PM

सॅमसंगने बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन आणला आहे. एम सीरीजमधील हा नवीन दमदार फोन आहे. Samsung Galaxy M05 हे नवीन मॉडेल बाजारात आलं आहे. या मोबाईलमध्ये अनेक दमदार फीचर आहेत. Samsung Galaxy M05 चा हा स्वस्त मोबाईल आहे. यामध्ये तुम्हाला 50MP चा मेन लेन्सचा ड्युअल रिअर कॅमेरा मिळतो. यामध्ये सुरक्षेसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. स्मार्टफोनसाठी कंपनी चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेटची ऑफर दिली आहे. हा स्मार्टफोन 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे.

असा आहे कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 2MP चा सेन्सर मिळते. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तर पुढील बाजूला कंपनीने 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये साऊंड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या मॉडेलसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 25W चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा डिव्हाईस Android 14 वर आधारीत One UI 6 वर काम करतो. या फोनला दोन वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट आणि चार वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट मिळतील. या फोनसोबतच्या बॉक्समध्ये तुम्हाला चार्जर मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

किती आहे किंमत?

Samsung Galaxy M05 एकाच कॉन्फिग्रेशनमध्ये येतो. हा स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरजेमध्ये येतो. हा स्मार्टफोन 7,999 रुपयात येतो. हा मोबाईल ग्राहकांना मिंट ग्रीन रंगात खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन Amazon.in आणि सॅमसंगच्या अधिकृत साईटवरुन खरेदी करता येईल.

Samsung Galaxy M15 5G

Samsung Galaxy M15 5G हा अजून एक स्मार्टफोन बाजारात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा, सोबत 5MP अल्ट्रा-वाईड एंगल कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. या फोनमध्ये पुढील बाजूस 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. मोबाईलच्या हँडसेटमध्ये 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वापर जास्त नसल्यास दिवसभर तुम्हाला बॅटरीची मदत होईल. हा फोन 25 वॉट वायर्ड फास्ट चार्ज सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना पाच वर्षांकरीता सिक्युरिटी अपडेट्स आणि चार वर्षांकरीता ओएस अपग्रेड्स मिळतील. Samsung Galaxy M15 5G Price in India या फोनची किंमत किती आहे? स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स आहेत. 4GB/128GB व्हेरिएंटची किंमत 13,299 रुपये तर 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 14,799 रुपये आहे.

तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....