Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन स्मार्टफोन घ्यायचा? मग ‘या’ फोनवर मिळतेय तब्बल 17 हजारांची सूट

Samsung Galaxy S25 सीरिजची विक्री सुरू झाली आहे. या सीरिजअंतर्गत कंपनीने गेल्या महिन्यात Samsung Galaxy S25 अल्ट्रा, गॅलेक्सी S25+ आणि गॅलेक्सी S25 हे तीन स्मार्टफोन लाँच केले.

नवीन स्मार्टफोन घ्यायचा? मग 'या' फोनवर मिळतेय तब्बल 17 हजारांची सूट
samsung galaxy s25
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 5:48 PM

तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा आहे का? असं असेल तर Samsung Galaxy S25 सीरिजची विक्री सुरु झाली आहे. Samsung Galaxy S25 हा तुम्हाला घ्यायचा असेल तर याची किंमत 80,999 रुपयांपासून सुरू होते. एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 8000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. इतकेच नाही तर गॅलेक्सी वॉच 7, गॅलेक्सी वॉच अल्ट्रा किंवा गॅलेक्सी बड्स 3 सीरिज वर 18000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याविषयी आपण जाणून घेऊया.

फोनवर बंपर डिस्काउंट

Samsung Galaxy S25 सीरिजची विक्री सुरू झाली आहे. या सीरिजअंतर्गत कंपनीने गेल्या महिन्यात Samsung Galaxy S25 अल्ट्रा, गॅलेक्सी S25+ आणि गॅलेक्सी S25 हे तीन स्मार्टफोन लाँच केले. लाँचिंगसोबत कंपनीने स्मार्टफोनसाठी प्री-रिझर्व्हेशन सुरू केले. स्मार्टफोन आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सेलमध्ये फोनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे.

किंमत काय?

Samsung Galaxy S25 किंमत 80,999 रुपयांपासून सुरू होते. याचा दुसरा व्हेरियंट 92,999 रुपयांना आला आहे. प्लस व्हेरियंटची किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. दुसरा व्हेरियंट 1,11,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन आयसिब्लू, सिल्व्हर शॅडो, नेव्ही आणि मिंट रंगात उपलब्ध आहेत.

तर सीरिजचा अल्ट्रा फोन 1,29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. फोनचा दुसरा व्हेरियंट 1,41,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय टॉप व्हेरियंट 1,65,999 रुपयांमध्ये आला आहे. हा फोन टायटॅनियम सिल्व्हरब्लू, टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक आणि टायटॅनियम व्हाईटसिल्वर रंगात उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S25 हा फोन सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्ट तसेच अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे. फोनवर 9,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 8000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. इतकेच नाही तर गॅलेक्सी वॉच 7, गॅलेक्सी वॉच अल्ट्रा किंवा गॅलेक्सी बड्स 3 सीरिज वर 18000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Samsung Galaxy S25 स्मार्टफोनचे फीचर्स

Samsung Galaxy S25 मध्ये 6.2 इंचाचा आणि गॅलेक्सी S25 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. प्लस व्हेरियंटमध्ये 4900 mAh बॅटरी आणि 12GB रॅम सह 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. यात 50 मेगापिक्सलचा मेन, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अल्ट्रा फोनमध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच फोनमध्ये 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.