Partnered : True 48MP कॅमेरा, दमदार डिस्प्लेसह Samsung Galaxy F12 बाजारात, उरले फक्त काही तास

दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंग (Samsung)  5 एप्रिलला भारतात Galaxy F12 हा दमदार स्मार्टफोन लाँच करणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:50 PM, 3 Apr 2021
Partnered : True 48MP कॅमेरा, दमदार डिस्प्लेसह Samsung Galaxy F12 बाजारात, उरले फक्त काही तास
Samsung Galaxy F12

मुंबई : दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंग (Samsung)  5 एप्रिलला भारतात Galaxy F12 हा दमदार स्मार्टफोन लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर याबबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर या अपकमिंग स्मार्टफोनसाठी मायक्रोसाईट तयार करण्यात आली आहे. या मायक्रोसाईटवर कंपनीने मोबाईलबाबतची काही माहिती सादर केली आहे. (Samsung to Lanch new Galaxy F12 Smartphone with FullOnFab experience with True 48 MP Camera, know Features)

फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन भारतात 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर या नव्या फोनचं डिझाईन सादर केलं आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार Galaxy F12 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले मिळेल. सोबत 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल. सोबतच यामध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट मिळेल. या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर आणि 6,000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल.

गॅलेक्सी F12 मध्ये तुम्हाला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह बॉटम साईडला स्पीकर ग्रिल, 3.5mm हेडफोन जॅक आणि 3.5mm ऑडियो जॅकदेखील मिळेल. दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा फोन गॅलेक्सी A12 किंवा M12 चं रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येईल.

True 48MP कॅमेरा

कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्या या नव्या फोनमध्ये True 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने तयार केलेल्या मायक्रो साईटवर म्हटले आहे की, इतर ज्या कंपन्या 48 मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर करतात, त्यांच्यापेक्षा आम्ही देत आसलेला True 48MP कॅमेरा अधिक दमदार आहे.

कंपनीने मायक्रो साईटवर एक एकाच ठिकाणचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एक फोटो ‘उत्तम’ आहे, तर दुसरा फोटो ‘बरा’ आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्या दोन फोटोंपैकी जो उत्तम फोटो आहे, तो त्यांच्या गॅलेक्सी F12 या फोनच्या True 48MP कॅमेऱ्याद्वारे टिपलेला आहे. तर दुसरा फोटोदेखील 48 मेगापिक्सलच्याच्या कॅमेराने काढला आहे. परंतु आम्ही ऑफर करत असलेला 48 मेगापिक्सल कॅमेरा अधिक चांगला आहे.

शानदार डिस्प्ले

कंपनीने असे म्हटले आहे की, गॅलेक्स एफ 12 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्चर क्वालिटी इतर डिस्प्लेंच्या तुलनेत अधिक चांगली असल्याची बाब कंपनी मायक्रो साईटवर अपलोड केलेल्या दोन फोटोंच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर बातम्या 

64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरीसह Samsung Galaxy A72 लाँच, किंमत…

भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट; ‘या’ तारखेपर्यंत ऑफर

19 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात, ‘या’ Poco स्मार्टफोनवर शानदार डिस्काऊंट

(Samsung to Lanch new Galaxy F12 Smartphone with FullOnFab experience with True 48 MP Camera, know Features)