AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घरबसल्या कमवा पैसे’, Google वर सर्च करण्यापूर्वी करा हे काम

Google Search | घर बसल्या कमाईची संधी, असे काही तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर एकदा हे वाचाच. नाहीतर ही घाई तुम्हाला आर्थिक संकटात ओढू शकते. तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. काही हजारांच्या नादात तुम्हाला त्यापेक्षा अधिकचे नुकसान होऊ शकते. गुगल सर्च करताना ऑनलाईन फसवणूकीपासून दूर राहणे आवश्यक आहे.

'घरबसल्या कमवा पैसे', Google वर सर्च करण्यापूर्वी करा हे काम
| Updated on: Dec 19, 2023 | 11:31 AM
Share

नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : गुगलवर तुम्ही ऑनलाईन नोकरी अथवा कामाचा शोध घेत असाल तर सावज होऊ नका. त्यासाठी सावध राहा. कारण अनेक स्कॅमर्स, सायबर गुन्हेगार त्यांचे जाळे लावून बसले आहेत. ऑनलाईन जॉबच्या काही ऑफर तुम्हाला रस्त्यावर आणू शकतात. पार्ट टाईम जॉबचा फंडा चांगलाच अंगलट येऊ शकतो. असे अनेक प्रकार आपण बातम्यांमधून वाचले असतील. काही सायबर गुन्हेगार अशाच ऑफर्सचा भडीमार करतात. काही दिवस जॉबच्या बदल्यात मोबदला देतात आणि नंतर त्यांचे खरे रुप दाखवतात. तेव्हा सावज होण्याऐवजी सावध राहा.

जॉब पोर्टल पडताळा 

  • ऑनलाईन अनेक पोर्टल उपलब्ध आहेत. त्यातील काही व्हेरिफाईड तर काही फसवेगिरी करणारे आहेत.
  • पोर्टलची डिझाईन आणि त्यातील कंटेंट याची तपासणी करा. त्यातील माहितीचा पडताळा घ्या.
  • या पोर्टलविषयी सोशल प्लॅटफॉर्मवर पडताळा करा. त्याविषयी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.

जॉब ऑफर सावधानतेने वाचा

ऑनलाईन जॉबच्या अनेक ऑफर तुम्ही वाचल्या असतील. त्यातील काही फसव्या तर काही खऱ्या असतात. जॉब ऑफर लक्ष देऊन वाचा. त्यात पैशांची मागणी केली असेल, अथवा अनामत रक्कमेची मागणी असेल तर सावध राहा. तसेच अव्वाच्या सव्वा गोष्टी दिल्या असतील तर दूर राहा.

  • नोकरी देणाऱ्या कंपनीचे नाव, पत्ता आणि संपर्काची माहिती जाणून घ्या
  • कोणत्या पदासाठी नोकरी आहे. पद, जबाबदारी आणि पगाराची माहिती घ्या
  • पदासाठी अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, याची माहिती घ्या

पैसे देण्यापूर्वी दहादा विचार करा

  1. कोणती पण चांगली कंपनी नोकरीसाठी उमेदवाराकडून पैसै घेत नाही. ऑनलाईन नोकरी दरम्यान एखादी एजन्सी तुमच्याकडून पैसे मागत असेल तर धोका ओळखा.
  2. यासंबंधीच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. ऑनलाईन फ्रॉडसाठी सायबर गुन्हेगार लिंकचा वापर करतात. तुमच्या बँक खात्याविषयीची गोपनिय माहिती देऊ नका.
  3. वैयक्तिक माहिती शेअर करताना पण सावधगिरी बाळगा. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
  4. ऑनलाईन जॉब सर्च करताना चांगला रिझ्युमे तयार करा. कव्हर लेटर तयार करा.
  5. ऑनलाईन जॉबची काही प्लॅटफॉर्म आहेत. तिथे प्रयत्न करा.
  6. एखादा मित्र अशा कंपनीत काम करत असल्यास त्याची मदत घ्या.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.