AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेकंड हँड आयफोन घेताय, या गोष्टी चेक करा मग निर्णय घ्या…

Second Hand iPhone: कोणत्याही फोनसाठी चांगली बॅटरी अत्यावश्यक आहे. आयफोनसाठी त्याची बॅटरीची परिस्थिती खूप महत्वाची आहे. आयफोनची बॅटरीची हेल्थ ८० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास तो आयफोन विकत घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु त्यापेक्षा कमी असल्यास विचार करुन निर्णय घ्या.

सेकंड हँड आयफोन घेताय, या गोष्टी चेक करा मग निर्णय घ्या...
iphone
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 22, 2024 | 4:16 PM
Share

आयफोन घेण्याचे अनेक स्वप्न असते. परंतु अनेक जण किंमत जास्त असल्यामुळे आयफोन घेऊ शकत नाही. काही जण सेंकड हँड आयफोन घेण्याचा प्लॅन करतात. सेंकड हँड फोन घेणे काही चुकीचे नाही. ही डिल सुद्धा फायद्याची होऊ शकते. परंतु सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी काही गोष्टी चेक करणे गरजेच्या आहेत. अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. अर्ध्यापेक्षा जास्त पैसे तुमचे हा फोन दुरुस्त करण्यात जाईल. यामुळे सेंकड हँड आयफोन घेताना काय काळजी घ्यावी…

आधी खरेदीचा पुरावा तपासून घ्या

आयफोनच नव्हे तर कोणताही सेंकड हँड फोन घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदीचा पुरावा तपासून घेणे आहे. त्या फोनचे बिल चेक करायला हवे. ओरिनिजल बिलाची हार्ड कॉपी किंवा शॉफ्ट कॉपी काहीही चालू शकते. अनेक वेळा फोन वारंटीमध्ये असतो. जर तुम्हाला फोनची ओरिजनल बिल मिळाले तर तुम्ही या सर्व गोष्टी चेक करु शकतात.

सिरीयल नंबर असा चेक करा

फोन वारंटीमध्ये आहे का? हे तपासण्यासाठी सर्वात आधी आयफोनच्या सेटींगमध्ये जा. त्या ठिकाणी जनरल ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर अबाउट सेक्शनवर क्लिक करा. या ठिकाणी iPhone चा सिरियल नंबर तुम्ही चेक करु शकतात. हा सिरियल नंबर कॉपी करुन checkcoverage.apple.com वर टाकल्यावर सर्व डिटेल्स मिळतील.

बॅटरी तपासून घ्या

कोणत्याही फोनसाठी चांगली बॅटरी अत्यावश्यक आहे. आयफोनसाठी त्याची बॅटरीची परिस्थिती खूप महत्वाची आहे. आयफोनची बॅटरीची हेल्थ ८० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास तो आयफोन विकत घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु त्यापेक्षा कमी असल्यास विचार करुन निर्णय घ्या. आयफोनची बॅटरी चेक करण्यासाठी आयफोनच्या सेटींगमध्ये जा. त्या ठिकाणी बॅटरीचा पर्याय असले. त्याला क्लिक करा. Battery health and charging वर क्लिक करा. जर तुम्ही बॅटरीची हेल्थ चेक करु शकत नसाल तर तो आयफोन नकली आहे.

डिस्प्लेबाबत माहिती

लेटेस्ट आयफोन लागलीच तपासून घेत येईल. आयफोनच्या डिस्प्ले अनऑफिशियल सर्व्हिस सेंटरवर रिप्लेस किंवा रिपेयर तर केला नाही, हे तपासता येते. त्यासाठी आयफोनच्या सेटींगमध्ये जा. डिस्प्ले आणि ब्रायटनेसवर क्लिक करा. आता तुम्ही ट्रू टोन एक्टिव्ह करु शकता. जर ते एक्टिव्ह झाले नाही तर आयफोन रिपेयर केल्याची शक्यता अधिक आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली