AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sony ने लाँच केले सर्वात प्रीमियम हेडफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सोनी कंपनीने त्यांचा प्रीमियम ऑडिओ सिरीजमधील एक नवीन अपग्रेड असलेले 1000X द कलेक्शन हेडफोन्स सादर केले आहेत. तसेच हे हेडफोन्‍स या कंपनीचे सर्वात प्रीमियम कलेक्शन आहेत. चला तर मग या प्रीमियम हेडफोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Sony ने लाँच केले सर्वात प्रीमियम हेडफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
| Edited By: | Updated on: May 21, 2026 | 5:16 PM
Share

सोनी कंपनीने त्यांच्या नामांकित 1000X सिरीजच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त, 1000X द कलेक्शन नावाचे नवीन प्रीमियम वायरलेस हेडफोन्स सादर केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे आजपर्यंतचे सर्वात प्रगत आणि प्रीमियम 1000X मॉडेल आहे. यामध्ये DSEE अल्टिमेट, स्पेशल ऑडिओ, LDAC आणि पॉवरफुल ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन यांसारखी फिचर्स आहेत. या नवीन हेडफोन्सची बॅटरी लाईफ 24 तासांपर्यंत आहे. कंपनीने WH-1000XM6 साठी एक नवीन सँडस्टोन रंग देखील सादर केला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण सोनीचे हे प्रीमियम हेडफोनची किंमत किती आहे आणि त्याचे फिचर्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

किंमत किती आहे

कंपनीने अमेरिकेत याची किंमत $649.99 इतकी ठेवली आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 63,000 इतकी होते. हे हेडफोन्स प्लॅटिनम आणि ब्लॅक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. बॉक्समध्ये एक कॅरींग केस आणि 1.2-मीटरची काढता येणारी ऑडिओ केबल देखील समाविष्ट आहे.

प्रीमियम डिझाइन आणि पॉवरफुल ऑडिओ

सोनी 1000X द कलेक्शनमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण प्रीमियम डिझाइन आहे. मेटलचे घटक, हाताने पॉलिश केलेला फिनिश आणि मऊ व्हेगन लेदरचे आवरण याला एक प्रीमियम लुक देतात.

या हेडफोन्समध्ये नवीन 30 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत, जे कार्बन कंपोझिट डोम आणि सॉफ्ट-एज डिझाइनचा वापर करतात. कंपनीचा दावा आहे की यामुळे आवाजाची स्पष्टता, इंस्ट्रूमेंटमधील फरक आणि उच्च-फ्रिक्वेन्सी डिटेल्स उत्तम मिळते. दीर्घकाळ वापरासाठी या हेडफोन्समध्ये कुशन असलेला हेडबँड आणि पुन्हा डिझाइन केलेले इअरकप्स आहेत. अंदाजे 320 ग्रॅम वजनाचे हे हेडफोन्स अधिक आरामदायक बनवण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत.

DSEE अल्टीमेट आणि AI वैशिष्ट्यांची शक्ती

DSEE Ultimate वैशिष्ट्य असलेला हा सोनीचा पहिला हेडफोन आहे. कंपनीच्या मते, हे एज एआय (Edge AI) वापरून कॉम्प्रेस्ड म्युझिक फाइल्समधील गमावलेले तपशील रिअल-टाइममध्ये परत मिळवते. हे हेडफोन्स 360 रिॲलिटी ऑडिओ अपमिक्सला देखील सपोर्ट करतात, जे म्युजिक, चित्रपट आणि गेम्ससाठी वेगवेगळे मोड्स देतात.

वापरकर्ते फिजिकल लिसनिंग मोड बटण वापरून या मोड्समध्ये स्विच करू शकतात. यात WH-1000XM6 ची ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सिस्टीम देखील आहे, ज्यामध्ये 12 मायक्रोफोन्स आणि ॲडॅप्टिव्ह एनसी ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. हे सभोवतालच्या वातावरणानुसार नॉइज कॅन्सलेशन आपोआप समायोजित करते.

बॅटरी, कनेक्टिव्हिटी

सोनीचा दावा आहे की 1000X द कलेक्शन हेडफोन्स ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन चालू असताना 24 तासांपर्यंत आणि ते बंद असताना 32 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. यामध्ये ब्लूटूथ 6.0, मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटी आणि एसबीसी, एएसी, एलडीएसी व एलसी3 ऑडिओ कोडेक्ससाठी सपोर्ट आहे. वायरलेस रेंज अंदाजे 10 मीटर असल्याचा दावा केला जातो.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने