बाईक म्हणजे जीव की प्राण! तरीही तुम्हाला ‘हे’ फिचर्स माहित आहेत का?

बाईक हा प्रत्येकासाठी जीव की प्राण असा विषय असतो (special features of Bike for better ride).

बाईक म्हणजे जीव की प्राण! तरीही तुम्हाला 'हे' फिचर्स माहित आहेत का?
चेतन पाटील

|

Jan 28, 2021 | 10:19 PM

मुंबई : बाईक हा प्रत्येकासाठी जीव की प्राण असा विषय असतो. अनेक तरुणांचं बाईकवर प्रचंड प्रेम असतं. काही तरुणांना कॉलेज लाईफपासून घरच्यांकडून गिफ्ट म्हणून बाईक मिळते तर काही तरुण प्रचंड कष्ट करुन बाईक विकत घेतात. त्यामुळे बाईकशी त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं भावनिक नातं असतं. अनेकांना बाईक चालवण्याची प्रचंड आवड असते. काही तरुण तर बाईकवर मुंबई ते लेह, लडाख असा लांबचा प्रवास करतात. तर काही ऑफिसात, कॉलेजला जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाईक वापरतात (special features of Bike for better ride).

बाईकबद्दल कितीही आवड असली तरी काही तरुणांना त्यातील फिचर्सची पुरेशी माहिती नसते. अनेकांना तर वर्षोवर्षे बाईक हाताळूनही त्याबाबतची माहिती नसते. अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला माहित नसू शकतात याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. अनेकांना ते फिचर्स ठाऊकही असतील. मात्र ज्या तरुणांना याबाबत माहिती नसेल त्यांच्यासाठी हा खास रिपोर्ट आम्ही देत आहोत.

पास लाईट : प्रत्येक बाईकच्या डाव्या बाजूला पास लाईटचं बटण असतं. ते बटण कधी पिवळं तर कधी काळ्या रंगाचं असतं. रस्त्यावरुन जाताना जेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीला ओव्हरटेक करायचं असेल तेव्हा तुम्ही या बटणाचा वापर करु शकतात. हे बटण दाबल्यानंतर गाडीचे हेडलाईट ब्लिंक होतात. त्यामुळे पुढे असणाऱ्या गाडीचालकाला तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे, हे समजतो. तो तुम्हाला पुढे जाण्यासाठी जागा देतो. ओव्हरटेक करण्यासाठी हे एक चांगलं आणि सुरक्षित माध्यम आहे.

किल स्विच : या बटनाच्या नावातच किल आहे. हे बटन उजव्या बाजूला हॅण्डलला असतं. हे बटन तुम्ही कोणत्या पार्किंगला लावलं तर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जास्त उपयोगी पडू शकतं. कारण हे बटन चोरांपासूनही वाचवतं. हे बटन ऑन केलं तर तुमची गाडी कितीही प्रयत्न केले तरी चालू होणार नाही.

हाय बीम-लो बीम : प्रत्येक बाईकमध्ये ही सुविधा असते. या बटनांचा वापर रात्रीच्या वेळी जास्त फायदा होतो. हाय बीम बटनामुळे तुम्हाला लांबपर्यंतचा रस्ता दिसतो. तर लो बीममुळे तुम्ही रस्त्याला फोकस करु शकता. कारण अनेकवेळा खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये गाडी पंचर होते. लो बीममुळे तुम्हाला खड्डे जास्त ठळकपणे दिसतील.

ट्रिप बटन : हे बटन साधारणत: सर्वच गाड्यांमध्ये असते. तुम्ही तुमच्या घरापासून ते तुम्हाला हव्या त्या ठिकाणापर्यंतच अंतर जाणू शकता. याशिवाय या बटनामुळे तुम्हाला तुमच्या गाडीचं एव्हरेजही कळू शकतं (special features of Bike for better ride).

हेही वाचा : खासदार भावना गवळींचा राजेंद्र पाटणींशी वाद, भरचौकात बडवून पाय तोडू, शिवसेना आक्रमक

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें