AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata iPhone : टाटा बनवणार आयफोन, किंमतीत होणार का घट? कुठे असणार प्लॅान्ट?

टाटा समूह एप्रिलच्या अखेरीस आयफोन निर्माता विस्ट्रॉनचा बेंगळुरूमधील आयफोन प्लांट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथे असलेल्या प्लांटचे अधिग्रहण पूर्ण झाल्यावर, ते अॅपल उत्पादनांसाठी देशातील पहिले स्वदेशी उत्पादन लाइन बनेल.

Tata iPhone : टाटा बनवणार आयफोन, किंमतीत होणार का घट? कुठे असणार प्लॅान्ट?
टाटा आयफोनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 11, 2023 | 9:23 PM
Share

मुंबई : आयफोन वापरणे आजही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची असलेली किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत होती, परंतु आता भारतीयांना एक मोठी भेट मिळणार आहे आणि आता आयफोन खरेदी करणे स्वस्त होणार आहे. आता आयफोनचे उत्पादन भारतातील प्रतिष्ठित कंपनी टाटा (Tata iPhone) यांच्याकडे त्याची कमान येणार आहे, टाटा लवकरच भारतात आयफोन तयार करण्यासाठी नवीन उत्पादन प्लांट खरेदी करणार आहे. हा प्रोडक्शन प्लांट मिळाल्यानंतर आयफोनची निर्मिती भारतातच केली जाईल आणि त्यामुळे त्यांचे आयात शुल्क कमी होईल आणि भारतीय ग्राहकांना ते खरेदी करण्यासाठी सध्या पेक्षा कमी रक्कम मोजावी लागणार आहे.  टाटा समूह एप्रिलच्या अखेरीस विस्ट्रॉनचा आयफोन प्लांट (wistron iphone manufacturing company) ताब्यात घेणार आहे. त्यानंतर  टाटा कंपनी आयफोनचे उत्पादन सुरू करेल.

विस्ट्रॉनमधून होऊ शकते कर्मचारी कपात

अहवालानुसार, टाटा समूहाने प्लांटमध्ये आधीच संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संपादन प्रक्रियेचा एक भाग म्हणून कारखाना सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. सुमारे चारशे मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांनाही कमी केले जाऊ शकते. असे म्हटले जात आहे की टाटा समूह या करारानंतर आयफोन 15 बनवण्यास सुरुवात करेल. विस्ट्रॉनचा भारतीय प्लांट सध्या  iPhone 12 आणि iPhone 14 चे उत्पादन करत आहे.

टाटाने बेंगळुरू प्लांट ताब्यात घेतल्यानंतर, विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल कारण भारतात ऍपल उत्पादनांचे उत्पादन करणारा हा एकमेव प्लांट होता.  ऍपल उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अंदाजे  600 दशलक्ष डाॅलर्स इतकी आहे. या व्यव्हाराकडे एक महत्त्वपूर्ण विकास म्हणून पाहिले जात आहे, विशेषत: अशा वेळी जेव्हा Apple चीनमधून उत्पादनासाठी भारताकडे पाहात आहे.

आयफोन 15 च्या निर्मितीपासून करणार श्रीगणेश

टाटा कंपनी भारतात आयफोन 15 चे उत्पादन सुरू करणार आहे.  एका अंदाजानुसार आयफोन 15 ची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली जाऊ शकते. टाटा कंपनीने नेहमीच गुणवत्तेची विशेष काळजी घेतली आहे, अशा परिस्थितीत भारतीय ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे. प्लांट टेकओव्हर पूर्ण होताच, आयफोन 15 चे उत्पादन भारतात सुरू होईल आणि लॉन्च झाल्यानंतर, भारतीय ग्राहकांना खरेदी करता येईल.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप