AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी सांगलीत वातावरण तापलं, चंद्रकांत पाटलांची मोठी खेळी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचं राजकारण सुरू आहे, असा आरोप माजी खासदार संजय काका पाटलांकडून करण्यात आला आहे. तसेच विशाल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी सांगलीत वातावरण तापलं, चंद्रकांत पाटलांची मोठी खेळी
chandrakant patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 4:09 PM
Share

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचं राजकारण सुरू आहे, असा आरोप माजी खासदार संजय काका पाटलांकडून करण्यात आला आहे. खासदार विशाल पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात भेट होऊन चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना आपण देखील भेटल्याचं संजयकाका पाटलांनी यावेळी स्पष्ट केल आहे. दरम्यान संजय काका पाटलांकडून चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांची भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पॅनल होणार की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत होणार,याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भाजपा उमेदवाराला, खासदार विशाल पाटलांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी संचालक राहुल महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, यावेळी खासदार विशाल पाटलांनी राहुल महाडिक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, महाडिक हे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक आहेत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाडिक बंधू हे जिल्हा बँकेत आले होते.

यावेळी खासदार विशाल पाटलांनी महाडिक बंधूंची जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारावर भेट घेतली, या भेटीदरम्यान विशाल पाटलांनी राहुल महाडिकांना पुष्पगुच्छ दिला, या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र  विशाल पाटलांच्या शुभेच्छा एक प्रकारे जयंत पाटलांच्या विरोधकांना पाठबळ म्हणून तर नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज जिल्हा बँकेत उमेदवारांची झुंबड उडाली. भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भाजपाकडून भाजपा आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,माजी संचालक राहुल महाडिक,नीताताई केळकर यांच्यासह सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर शिवसेना शिंदे पक्षाकडून अमोल बाबर यांच्यासह चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत,

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप